बळीराजा माझा हा
राबतोय तो शिवारी
नका मूल्यहिन करू
घाव लागे जिव्हारी
सकाळपासूनी रात्री
खपतोय हा पोशिंदा
विनवितो काकुळीने
कुठे गेलाय कायदा
कधी दुष्काळ भोगे
पाऊसही अवकाळी
कर्जबाजारी होऊनी
मुकअश्रूच तो ढाळी
स्वतः राहूनअर्धपोटी
पुरवी धान्य जगाला
नसावी अवहेलनाही
आवर घालू रागाला
नका करू माणसांनो
त्याच्या कष्टाचे मोल
जगाचाच हा पोशिंदा
नाही पिटत उगा ढोल
रात्रंदिनी राबतानाच
भाव मालाचा कळतो
तुमचीच ही घासाघीस
जीव त्याचाच जळतो
वेचुनी काट्या-कुट्या
पेटतेय त्याचीच चूल
पगारदार नोकर तुच
द्यावे त्यास एक फूल
जीवनातलाच आनंद
घेऊ द्या या बळीला
मुलाबाळां शिकवण्या
वाढवायचेय कळीला
सौ.भारती सावंत
मुंबई
समन्वयक – पालघर जिल्हा