Homeवैशिष्ट्ये''बाप माझा''

”बाप माझा”

माझ्या साठी बाप माझा सारी रात्र जगायचा.
उपाशीपोटी बाप माझा शेता मध्ये राबायचा.

दुःखाचे ते जीवन होते
कधी रुसायची मूल
मुलांसाठी भाकर नाही
स्वतःचे व्हायचे हाल
मुलांसाठी भाकर देऊन, स्वतः पाणी पिऊन निजायचा.

उपाशीपोटी बाप माझा शेता मध्ये राबायचा……

घाम गाळून काम तो शेतामध्ये करायचा.
मुलांच्या आयुष्यासाठी रात्रंदिवस झुरायचा.
पाऊस असो या ऊन कधीच नाही थांबायचा.

उपाशीपोटी बाप माझा शेता मध्ये राबायचा……

रात्र असो या दिवस
मुलांच्या स्वप्नाकडे बघून चालायचा
दुःख आज आहे
तर उद्या सुख येतील याचाच विचार करायचा
रात्री झोप न घेता , कस्ट करत त्या दिवसाची वाट बघायचा.

माझ्या साठी बाप माझा सारी रात्र जगायचा
उपाशीपोटी बाप माझा शेता मध्ये राबायचा.

  • वर्षा कुरुडे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular