चांगल राहून उपयोग नाही,तू वाईट वागलेला बरा
नात जोडण्यात अर्थ नाही,तू एकटा जगलेला बरा
कुणी नाही कुणासाठी,जो तो स्वार्थी कसा आहे
मन मोकळ्या स्वभावात आता बदल केलेला बरा
मलाच का भेटतात अशी माणसे,मला माहीत नाही
मित्राला जवळ करण्यापेक्षा,मी शत्रू पोसलेला बरा
खूप दुःख होत जेव्हा,आपलीच….इग्नोर करतात
असल्या खोट्या नात्याचा मणका मोडलेला बरा
साध राहून काही साध्य होत नाही…या कलयुगात
कुठेतरी जाऊन कविराज तू वनवास घेतलेला बरा
नको राहू या मतलबी शहरात…तुझं कुणी नाही इथे
मातीला कुणी येणार नाही,तू बिनधास्त मेलेला बरा
✍️राजू गायकवाड(कविराज)
मुख्यसंपादक