Homeवैशिष्ट्येभाग ३१ निधी संकलनाला सुरुवात करताना

भाग ३१ निधी संकलनाला सुरुवात करताना

भाग ३१
निधी संकलनाला सुरुवात करताना

आपली निधि संकलनाची गरज:
▶️ आपल्याला नक्की कोणकोणत्या कारणासाठी निधी लागणार आहे ते ठरवायला हवं आणि त्यांचे प्राधान्यक्रम हि ठरवायला हवेत.
▶️ संस्थेला आर्थिक व इतर मदत देणारी निधी संसाधन वाढवणे आणि शाश्वत कामांवर भर देणे.
▶️ देणगीदारांच्या मदतीवर/ आवश्यकतेवर अवलंबून नाहीत अशी काही संसाधन शोधायला हवीत.
▶️ संस्था म्हणून एका देण्गीदारावर किंवा संसाधनावर अवलंबित्व असून चालणार नाही. त्यामुळे धोका वाढू शकतो.
▶️ उत्तरदायित्व, पारदर्शकता चांगल्या प्रकारे राखता यायला हवी.
▶️ लोकांच्या विश्वासाला,देणगीला पात्र ठरेल असं काही काम उभं करायला हवं, एखाद्या चांगल्या सामाजिक कामात पुन्हा पुन्हा मदत करण्याची संधी मिल्स्वी असं लोकांना वाटायला हवं.
▶️ एकाच उपक्रमास एकापेक्षा जास्त व्यक्ती/ संस्थेचा पाठिंबा असल्यास तसे स्पष्टपणे नमूद करा.

निधी संकलनातील विश्वस्ताची भूमिका
▶️ संस्थेचे जबाबदार पदाधिकारी ह्या नात्याने संस्थेचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हि अतिशय महत्वाची जबाबदारी विश्वस्तांवर असते.
▶️ संस्थेस विविध मार्गाने आर्थिक स्त्रोत/ओघ चालू राहण्यासाठी विश्वस्तांनी, पदाधिकाऱ्यांनी निधी संकलनासाठी निधीची गरज, संस्थेचे अंदाजपत्रक, व त्या दृष्टीने आवश्यक असणारे नियोजन व कृती आराखडा करून त्यांची अंमलबजावणी या महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात.
▶️ संस्थेचे विविध प्रकारे, विविध स्वरुपात आलेल्या देणगीचे योग्य नियोजन, आयोजन, प्रयोजन, संयोजन, विनियोग हे सर्वच विश्वस्तांनी पाहणे बंधनकारक आहे.

निधीसंकलना संदर्भात विश्वस्तांच्या भूमिकेबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न :
न्यासांच्या उत्पन्नाचे मार्ग/ साधने कोणती:-
न्यासांच्या उत्पन्नाचे खालील मार्ग असू शकतात.
१) व्यक्ती, कंपनी, न्यास, संस्था, परकीय संस्था, धर्मादाय निधी इत्यादींकडून मिळालेली देणगी
२) कमी/दीर्घ काळाच्या गुंतवणुकीवरील लाभांश अथवा व्याज.
३) लाभार्थीकडून बनवल्या जाणाऱ्या वस्तूंची विक्री
४) न्यासांनी भाड्याने दिलेल्या मालमत्तेचे भाडे
५) सभासदाकडून मिळालेली देणगी

न्यास भांडवली देणगी स्वीकारू शकतात का?
हो, परंतु सदर देणगीदाराने त्याबाबत लेखी सूचना न्यासास देणे आवश्यक आहे.

न्यास निनावी देणगी स्वीकारू शकतात का?
आर्थिक वर्ष २००६-०७ पासून धर्मादाय न्यास व संस्थांना देण्यात येणाऱ्या निनावी देणग्या करपात्र झाल्या आहेत. मात्र धार्मिक न्यास आणि संस्था यांना देण्यात येणाऱ्या निनावी देणग्या करपात्र करण्यात आलेल्या नाहीत. धर्मादाय तसेच धार्मिक, दोन्ही उद्दिष्ट असणाऱ्या न्यासांना देण्यात येणाऱ्या निनावी देणग्या जर धार्मिक उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी देण्यात आल्या असतील तर त्यादेखील करपात्र ठरत नाहीत.

एक न्यास दुसऱ्या न्यासास भांडवली देणगी देऊ शकते का?
हो! मात्र आयकर अधिनियमानुसार एक न्यास दुसऱ्या न्यासास अशी देणगी फक्त स्वतःच्या वर्तमान/चालू उत्पन्नातून देऊ शकते. अशी देणगी न्यास स्वतःकडे जमा झालेल्या निधीतून देऊ शकत नाही.

न्यास स्थावर मालमत्ता विकू किंवा भाड्याने देऊ शकतात का अथवा मालमत्तेचे विभाजन करू शकतात का अथवा बक्षिस म्हणून देऊ शकतात?
न्यासाची मालमत्ता विकण्यासाठी अथवा भाड्याने देण्यासाठी अधिनियमाच्या कलम ३६ अन्वये धर्मादाय आयुक्तांची परवानगी आवश्यक असते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular