Homeवैशिष्ट्येभाग ३८ निधिसंकलनाची तंत्र

भाग ३८ निधिसंकलनाची तंत्र

भाग ३८
निधिसंकलनाची तंत्र

विशिष्ट प्रकल्पासाठी अनुदान
▶️ संस्थेच्या मोठ्या महत्वकांक्षी उपक्रमासाठी एखादा मोठा कार्यक्रम व स्मरणिका प्रकाशन असा जोड कार्यक्रम आयोजन.
▶️ विविध सामाजिक प्रश्नावर काम करण्यासाठीचा निधी गोळा करण्यासाठी एखादा विशिष्ठ दिवसाचे औचीत्य साधून मरेधोन आयोजित करणे.
▶️ मिळकतीतून/ रोजगारातून दर महिन्याला होणारी कपात (Payroll Deduction)
▶️ Big Gift
▶️ मृत्युपत्र
निधिसंकलनासाठी मोक्याच्या ठिकाणी Collection Boxes ठेवणे.

मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन :
मोठ्या स्वरुपात निधी गोळा करण्यासाठीचा एक सुनियोजित कार्यक्रम (Donation Drive) उदा. गावातल्या शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी मोठी रक्कम जमा करण्यासाठीचा कार्यक्रम. बरेचदा, अशा कार्यक्रमाच्या आयोजनात स्वयंसेवकांचा सहभाग खूप महत्त्वाचा ठरतो. उच्चपदावर काम करणाऱ्या स्वयंसेवकांची बँक आपल्याकडे असायला हवी. असा कार्यक्रम करण्यापूर्वी त्या कार्यक्रमाच्या यशाची शक्यता पडताळून पहायला हवी. नक्की काय साध्य करायचंय हे पक्क ठरवायला हवं, स्वयंसेवकांची कमिटी घेण, कार्यक्रमापूर्वी पुष्कळशा निधीदात्यांपर्यंत पोहचण आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी करावयाच्या छोट्या-छोट्या गोष्टींचे सूक्ष्म नियोजन करून त्या अशा पार पाडण हे सर्व काळजीपूर्वकरित्या झाल्यास यशाची हमी मिळू शकेल.
अशा प्रकारच्या मोठ्या कार्यक्रमानंतर निधीदात्यांचे आभार मानण हा एक वेगळा कार्यक्रम असतो. त्यासाठीचंही नियोजन आधीच करायला हवं.
संस्थेच्या मोठ्या उपक्रमासाठी (शाळेची बांधणी- School Building, इस्पितळ-हॉस्पिटल, वसतिगृह-(Hostel) वगैरे साठी बऱ्याचदा एखादा मोठा कार्यक्रम (Mega Event) व बरोबर स्मरणिका प्रकाशन असा जोड कार्यक्रम केला जातो.
Event साठी लक्षात ठेवायच्या ३ महत्वाच्या गोष्टी :
Date- दिनांक ; Time-वेळ ; Venue-स्थळ

कार्यक्रम निवडताना घ्यावयाची काळजी :
▶️ संस्थेकडे उपलब्ध असलेला पैसा
▶️ कार्यक्रमाचे अंदाजपत्रक
▶️ संस्थेकडे असलेले संसाधन मनुष्य, विवरण
▶️ योग्य वेळ

Payroll Deduction :
एखाद्या कंपनीशी संपर्क साधून त्यांना आपल्या कामांबाबत माहिती दिल्यानंतर त्या कंपनीत काम करणारे सर्व नोकरदार जेव्हा त्या विशिष्ठ संस्थेला निधी देण्याच्या दृष्टीने दर महिल्याला आपल्या पगारातील काही रक्कम त्या संस्थेच्या नवे जमा करण्याची परवानगी कंपनीला देतात. त्यानुसार, तेवढी रक्कम कापून एकूण जमा रक्कम स्वयंसेवी संस्थेला देणगीस्वरुपात दिली जाते. त्यामुळे संस्थेला दर महिन्याला खात्रीलायकरित्या काही रक्कम देणगीस्वरुपात मिळत रहाते.
कंपनीच्या व्यवस्थापन विभागाशी उत्तम संपर्क असण, कंपनीला आणि तिथे काम करणार्यांना संस्थेच्या कामाविषयी, उद्दिष्टाविषयी पूर्ण विश्वास वाटायला हवा आणि तो कायम रहायला हवा, ज्या कंपनीची आपण संपर्क साधतोय त्यांच्या कामाप्रमाणे निधी देण्यासाठीचे नवीन, कल्पक मार्ग सुचवायला हवेत, जेणेकरून ती रक्कम बाजूला काढण सोपं जाऊ शकेल अशा प्रकारच्या देणगीसाठी संस्था चांगल्या अर्थानं कायम प्रकाशात रहाण उपयोगाच ठरत. शिवाय, या अनुषंगाने कालांतराने हेच नोकरदार आर्थिक मदतीबरोबरच स्वतः स्वयंसेवक म्हणून संस्थेच्या कामात सहभागी होऊ शकतात.
निधीदात्या संस्थेचे व्यवस्थापन व मिळालेल्या निधीचे आर्थिक व्यवस्थापन ह्यावर लक्ष द्यायला हवं.

Majot /Big gifts :
संस्थेच्या एखाद्या मोठ्या उपक्रमासाठी अनेक देणगीदारांचा मोठा सहभाग असतो.ह्यासाठी मात्र पूर्वतयारी चांगली हवी. प्रकल्पाचा आढावा, प्रकल्पाचे समाजात होणारे फायदे, लागणारा निधी, त्यापैकी किती निधीची गरज आहे व त्याची तरतूद, कधी निधी दात्या संस्थांच्या काही वेगळ्या अपेक्षा/ इच्छा असतात त्यांचेही काटेकोर पालन.
संस्थेने अशी देणगीदारांचा काळजीपूर्वक शोध घ्यायला हवा. अशा प्रकारची देणगी मिळवण्यासाठी काही विशिष्ठ काळाचंही भान ठेवायला हवं. उदा. वयस्कर व्यक्ती स्वतःकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता असल्यास अशाप्रकारच्या देणग्या देण पसंत करतात. अशा प्रकारची देणगी मिळाल्यावर देणगीदाराला इतर असे संपर्क देता येतील का? हे जरूर विचारावं, त्यांच्या काही सूचना, कल्पना असल्यास त्याबाबतही विचारावं हे तंत्र शहरी भागात अधिक उपयुक्त आणि प्रभावी ठरत.

मृत्युपत्र- Will/ Beguest :
मृत्युपत्रात केलेली नोंद, देणगीदाराने मृत्युनंतर संस्थेला द्यायच्या देणगीबद्दलची व्यक्त केलेली तरतूद.

Greeting Card :
काही संस्था निधी संकलनासाठी उत्कृष्ठ डिझाईनच्या ग्रिटिंग कार्डाची छापाई व विक्रीतून निधी उभा करतात, CRY,Help age, Wide fund हि काही नावे आपण ऐकलेलीच आहेत.
ग्रिटिंग कार्ड उपक्रमात संस्थेची पूर्व नियोजनासाठी काही गुंतवणूक करण्याची क्षमता व तयारी असणे आवश्यक आहे.

Collection Boxes :
काही संस्था निधी संकलनासाठी सार्वजनिक ठिकाणी आपल्या संस्थेच्या कामाच्या मदतीच्या आवाहन स्वरुपात Collection boxes ठेवतात. त्यातून काही ठोस निधी उभा राहू शकतो. उदा, अपंग, कुष्ठरोग, पिडीत लोकांच्या पुनर्वसनासाठी उभा केलेला निधी, सार्वजनिक व्यवस्थापनाशी केलेले करार व आर्थिक व्यवस्थापन ह्याची मात्र काळजी घ्यायला हवी.

वस्तुरूपाने मदत :
बऱ्याच वेळा काही निधीदाते (व्यक्ती/संस्था) ह्या २ प्रकारे वस्तुरूपात मदत करतात.
▶️ संस्थेच्या विविध उपक्रमांशी निगडीत जरुरी असलेल्या/ गरज असलेल्या साधने व संसाधनासाठी मदत.
▶️ वापरलेल्या संसाधनाचे स्वयंसेवी संस्थांना हस्तांतरण बऱ्याचदा काही कंपन्या विशेषतः संगणकीय क्षेत्रात काम करणारी संस्था आपले वापरलेले संगणक/ प्रिंटर्स किंवा इतर साधन सामग्री स्वयंसेवी संस्थांना देणगीच्या स्वरुपात देतात. अशा देणग्यांचा स्वीकार जरूर करावा परंतु ह्या वापरलेल्या साधनांवर होणारा घसारा व त्यावस्तुचे आताचे मूल्य ह्यांची नोंद संस्थेच्या हिशोबपत्रकात आय व्यय व ताळमेळ पत्रकात यायला हवी.
▶️ आभार मानायला विसरू तर नकाच पण आपण केलेल्या मदतीमुळे काम कसे सुसह्य झाले हे वेळोवेळी कळवा.
▶️ नवीन संसाधनाची विनंती करत असताना त्या संसाधनेच्या देखरेखी/ देखभाली पोटी होणारा अंदाजित खर्चाची तरतूद करायला विसरू नका. सर्वात महत्वाचे ह्या सर्वाची संस्थेला नोंद हवी (संसाधनाच नाव/तपशील/ खरेदी घेतलेल्या संस्थेचा तपशील/ किंमत.
▶️ शक्य असल्यास ह्या संसाधनाचा विमाही उतरवा.

देणगीची विविध रूपे :
▶️ निरनिराळ्या दिवसांचे औचित्य साधून त्यानुसार देणगीसाठी आवाहन करणे
▶️ सेलिब्रिटीज ना राजदूत बनवणे (सदिच्छा दूत)
▶️ ज्या कामासाठी निधी हवा त्याच्या अनुषंगाने देणगीदार शोधणे. उदा. शाळाबाह्य/ बालकामगारांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम मुलांच्या शाळेत जाऊन एखाद्या उपक्रमाद्वारे आर्थिक/ वस्तुरुपातील मदतीचे आवाहन
▶️ रद्दीतून पैसे जमा करून मेळघाटातील कुपोषित मुलांना आरोग्य सुविधा मिळवून देणे
▶️ स्वयंसेवी संस्थांसाठी काही प्रदर्शन भरवली जातात. त्यात भाग घेऊन देणगीदारांना मदतीसाठी आवाहन करता येईल.
▶️ हल्ली विविध Websites वर देणगीसंदर्भातील माहिती उपलब्ध असते. त्याचा उपयोग करून घेता येईल. उदा. Give India आणि Guidestar
▶️ प्रत्येक संस्थेने आपला एक क्राॅर्पस (गंगाजळी) तयार करावा. तशा प्रकारची मदत करणाऱ्या दात्यांना शोधावा. पण असा क्राॅर्पस उभा करणे फार कठीण आहे हे ही लक्षात घ्यायला हवं.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular