Homeवैशिष्ट्येभाग ५७- स्वयंसेवी संस्था व्यवस्थापनात संवादाचे धोरण

भाग ५७- स्वयंसेवी संस्था व्यवस्थापनात संवादाचे धोरण

संवादाचे मुलभूत दोन प्रकार आहेत :
१. शब्दांद्वारे
२. शब्दांशिवाय- देहबोली
१. शब्दाद्वारे संवादाची वैशिष्टे :
१. शब्द हे विचारांचे संकेत असतात. ज्यामुळे आपल्याला तो विचार चटकन कळतो.
२. शाब्दिक संवादामुळे संदेश कळायला किंवा पोहोचायला विशेष अडसर होत नाही.
३. शब्दाद्वारे होणाऱ्या संवादावर आपण ताबा ठेऊ शकतो. जेणेकरून संवादामध्ये जास्तीत जास्त स्पष्टता येऊ शकेल.
२. शब्दाविना संवाद :
जेव्हा आपण कुणाबरोबर संवाद साधतो उदा. काय बोललं जातंय तेव्हा १०% हून कमी गोष्टी आपल्या लक्षात राहतात आणि म्हणूनच शब्दाशिवाय केलेला संवाद हा अधिक यशस्वी व परस्परातील सामंजस्याचे होऊ शकतो. शब्दाविना संवाद म्हणजे आवाज, बोलण्याची ढब, पाहणे, हात मिळवणे, हसणे इ. साधनांचा वापर करून संवाद करून संवाद साधणे. जसंकी काही समाजात हात मिळवणे फार महत्वाचे असते पण काही समाजात हात जोडणे अधिक महत्वाचे समजले जाते.
🔹शब्दाविना संवादाचे घटक:
🔹चेहऱ्यावरील हावभाव
🔹शारीरिक हालचाल
🔹स्पर्श
🔹संकेत
🔹वैयक्तिक वैशिष्टे
बऱ्याचदा रोजच्या किरकोळ संवाद/संभाषणात सुद्धा बरेच अडथळे येऊ शकतात. त्यापैकी काही खाली नमूद केले आहेत.
🔹आसपास असणारे आवाज, गोंधळ.
🔹भाषा वेगळी असणे किंवा अवघड असणे.
🔹ऐकणाऱ्याचे लक्ष नसणे.
🔹पूर्वग्रह.
🔹अतिउत्साह इ.
बरेच लोक हे एकण्यात निपुण नसतात. एका पाहणीनुसार असा निष्कर्ष काढण्यात आला कि जे जे काही आपण एकतो, त्यातील फक्त २५% प्रभावीपणे एकेले जाते.
🔹असंही दिसून आलं की बरेच लोक हे समजून घेण्यासाठी नव्हे तर प्रत्युत्तर देणाच्या हेतूने ऐकत असतात.

प्रतिक्रिया :
संवादाची एक प्रक्रिया असते. ज्यामध्ये शेवटचा पण फार महत्वाचा घटक म्हणजे प्रतिक्रिया, जेव्हा एखादी व्यक्ती बोलण्यातून किंवा कृतीमधून आपल्यापर्यंत एखादा संदेश पोहोचवते तेव्हा तो संदेश फक्त ग्रहण न करता त्यावर समर्पक अशी प्रतिक्रिया व्यक्त करणे हे सुद्धा फार महत्वाचे असते. प्रतिक्रियेमुळे नुसता संवादच सुकर होतो, असे नाही पण संदेश पाठवण्यात जर काही त्रुटी राहत असतील तर त्या सुधारण्यासाठी काही प्रयत्न केले जाऊ शकतात.
प्रतिक्रिया म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण त्यांनी केलेल्या किंवा बोललेल्या गोष्टीबद्दल कस विचार केला हे सांगणे, उत्तम प्रतिक्रिया म्हणजे वर्णन करणे. प्रतिक्रिया ही मूल्यांकनासाठी नसून साधारण वर्णन करण्यासाठी वापरण्यात यावी.
याउलट म्हणजे टीका करणे. टीका करताना आपण वर्णन तर करतोय, त्याचबरोबर आपलं निरीक्षण, त्याबद्दलचे आपले मत व कुठली गोष्ट कधी व कधी बदलावी याबाबत बोलतो. म्हणूनच उत्तम नवड साधत असताना, आपण प्रतिक्रिया व्यक्त करण्यावर भर द्यावा आणि शक्यतोवर टीका टाळावी.

प्रतिक्रियेचे काही मुलभूत नियम :
१. प्रतिक्रिया हि नेहमी विधायक किंवा पुढील कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारी असावी.
२. प्रतिक्रिया देताना सकारात्मक शब्दाचा वापर करणे हितावह
३. गतकाळातील कृतीवर चर्चा करण्याएवजी भविष्यकाळातील योजनांविषयी बोलावे.
४. प्रतिक्रिया देताना मदत करावी पण न्याय निवडा करणाऱ्याची भूमिका नको.
५. प्रतिक्रिया व्यक्त करून, संवाद हा दोन्हीकडून घडावा.

६. प्रतिक्रिया हि वेळेत घ्यायला हवी.
प्रतिक्रिया देताना किंवा ऐकताना दोन्ही बाजूच्या लोकांनी घ्यावयाची काळजी म्हणजे, हि प्रतिक्रिया कुणा व्यक्तीसाठी नसावी तर होणाऱ्या कार्यावर असावी. जी प्रतिक्रिया दिली जाईल ती सकारत्मक दृष्टीने होऊन तिचा उपयोग आपल्या कामात सुधारणा जितक्या चांगल्या रीतीने करून आणण्यासाठी करता येईल हे पहावे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular