Homeवैशिष्ट्येभाग:-12 ( जमा ) पत्रके / तेरीज पत्रके

भाग:-12 ( जमा ) पत्रके / तेरीज पत्रके

MNDA भाग:-12
( जमा ) पत्रके / तेरीज पत्रके खतावणीची अगर पुस्तकांची अचूकता आजमावण्यासाठी दरमहा तेरीज पत्रक तयार करा , म्हणजे वर्षाचे शेवटी हिशोब पुरे करणे सोपे जाईल . तेरीज पत्रके दरमहा तयार केल्यास त्या त्या वेळीच फरक काढणे सुलभ होऊन वर्षाखेरीस फरक राहण्याची शक्यता राहणार नाही .
विशिष्ट कायद्यानुसार पगार कंत्राटदाराला अदा रकमा : विशिष्ट अदा करावयाच्या रकमातून आयकर कापून घेणे . आयकर कायद्यानुसार पगार , कंत्राटदाराला अदा करावयाच्या रकमा इत्यादी मधुन आयकर कापणे आवश्यक आहे . ह्यासाठी आयकर कार्यालयातून आयकर कापल्याबद्दलचे देण्यात येणाऱ्या सर्टिफिकेटांचे फार्म उपलब्ध आहेत .
कोटेशन्स मागविणे
मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १ ९ ५० अन्वये रु . ५००० / – वरील इमारत दुरुस्ती खर्च आणि भांडवली खर्चासाठी कोटेशन्स मागविणे आवश्यक असते . आर्थिक स्थितीचा भाग म्हणून इतर मोठ्या खर्चास सुध्दा कोटेशन्स मागवून वाजवी किंमत व उत्तम दर्जा हे लक्षात ठेवून मगच खरेदी करण्यास यावी व शक्यतोवत थेट उत्पादकाकडून खरेदी करण्याची प्रथा ठेवावी म्हणजे सुट उपलब्ध असल्यास त्याचा फायदा मिळू शकतो . कामाच्या जबाबदारीची आदलाबद्दल
कार्यालयीन कामकाजात एकत्र व्यक्ती तेच काम सातत्याने करत असेल ( म्हणजे बऱ्याच कालावधीकरता ) तर त्या व्यक्तीस दुसऱ्या कामाचा अनुभव मिळणार नाही . तसेच एखाद्या कामावर त्या व्यक्तीची मक्तेदारी होऊन बसेल . सर्व प्रकारचे काम प्रत्येक व्यक्तीस माहिती व्हावी म्हणून एखाद्या विशिष्ट व्यक्तीवाचुन काम अडून बसले असे होणार नाही व त्यासाठी एकमेकास एकमेकाचे काम आलटून पालटून करण्यास सांगावे .
एकाचे काम दुसऱ्याने तपासणे
कार्यालयाने कामात चुक राहू नये व एखादी चुक राहिली तर ती लक्षात यावी यासाठी एकाचे काम दुसऱ्याने तपासण्याची पध्दत फायदेशीर ठरते . जसे व्हाऊचर तयार करणारी व्यक्ती कोठे त्रुटी नाही ना याची वरिष्ठ अधिकारी तपासणी करुन ते व्हाऊचर रोखपालाकडे ठेवील . रोखपाल कीर्दीत नोंद करताना व्हाऊचरवरील बेरजेत वगैरे चूक नाही ना याची खात्री करून घेईल . अशा त – हेने तीन व्यक्तींच्या हातातून जाते व काही चूक असल्यास लगेच लक्षात येते . एकच व्यक्ती असेल तर चूक लक्षात येणार नाही . अर्थात ही पध्दत कायमचा मोठा व्याप असणाऱ्या संस्थांच्या बाबत अमलात आणता येईल ,
अनुभवी व्यक्तीची रोखपाल व कार्यालयीन कामकाज प्रमुख नेमणूक ज्या संस्थेस शक्य असेल त्या संस्थेने अनुभवी व्यक्तीची रोखपाल व कार्यालयीन कामकाज प्रमुख म्हणून नेमणूक करावी . यात हयगय मुळीच करु नये , संस्थेची आर्थिक परिस्थिती नसेल तर गोष्ट वेगळी .
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular