Homeवैशिष्ट्येभाग 14 संस्थेचे अंदाजपत्रक

भाग 14 संस्थेचे अंदाजपत्रक

MNDA ✒️ भाग 14
संस्थेचे अंदाजपत्रक

१) आज आपण सर्वजण स्वयंसेवी संस्थेचा वरचष्मा असलेल्या विश्वामध्ये रहात आहोत. आपला जन्म रुग्णालयात होतो, आपण शाळेमध्ये शिकतो, आपण कुटुंबामध्ये राहतो. आपल्याला खाजगी क्षेत्रातील संस्थेमध्ये किंवा सरकारी नोकरी मिळते. निवडणूक आयोग देशामध्ये निवडणुका घेतात व त्यात आपण राजकीय पक्षांना (त्यांच्या उमेदवाराला) मत देतो.
२) रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, खाजगी संस्था, निवडणूक आयोग हि सर्वच स्वयंसेवी संस्थेची विविध रूपे आहेत. मग सहाजिकच असा प्रश्न उपस्थित होतो कि स्वयंसेवी संस्था म्हणजे काय? साध्या आणि सोप्या भाषेत बोलायचे झाले तर असे म्हणता येईल कि “एका/ एखाद्या सुनिश्चित केलेल्या समान उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी विशिष्ठ पद्धतीने कार्य करणारा दोन किंवा अधिक व्यक्तींचा समूह म्हणजे स्वयंसेवी संस्था होय.”
३) म्हणून स्वयंसेवी संस्थासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत.
🔹दोन किंवा अधिक लोकांचा समूह
🔹विशिष्ट कार्यपद्धती
🔹सुनिश्चित ध्येय/उद्दिष्ट
४) अशा प्रकारे स्थापित झालेल्या स्वयंसेवी संस्थाच्या ध्येयांची पूर्तता करण्यासाठी व्यवस्थापन व व्यवस्थापकांची आवश्यकता आहे. पुण्यात झालेल्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसच्या अधिवेशनप्रसंगी (३ आणि ७ जानेवारी २०००) पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूनी संयोजनाची वेळी व्यवस्थापन शास्त्राची तत्वे अंगीकारण्याचा आवर्जून उल्लेख केला आहे.
५) स्वयंसेवी संस्था हवी, स्वयंसेवी संस्थासाठी व्यवस्थापन हवे हे मान्य केले कि मग साहजिकच पुढचा प्रश्न उपस्थित होतो. तो म्हणजे व्यवस्थापन म्हणजे काय? आणि व्यवस्थापनाचा, स्वयंसेवी संस्थेचा व स्वयंसेवी संस्थेच्या उद्दिष्टांचा काय संबंध ?
“स्वयंसेवी संस्थेच्या / संघटनेच्या सुनिश्चित केलेल्या ध्येयधोरणांची पूर्ती व्हावी व त्यासाठी उपलब्ध असलेल्या साधनांचा अतिशय योग्य व परिणामकारक वापर व्हावा यासाठी नियोजन, संघटन, नेतृत्व व नियंत्रण यांची प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन होय”
६) म्हणजेच व्यवस्थापन हि एक प्रक्रिया आहे जिच्यामध्ये वेगवेगळ्या परंतु परस्परसंबंधीत अशा चार उपप्रक्रियांचे समावेश होतो. या उपप्रक्रिया खालीलप्रमाणे –
▶️नियोजन : काय करायचे आहे ते ठरविणे
▶️संघटन : कसे व कोणी करायचे हे ठरविणे
▶️नेतृत्व : दिशा देणे व वागणूक घडविणे
▶️नियंत्रण : कार्य ठरविल्याप्रमाणे पार पाडले आहे कि नाही. याची खातरजमा करणे व आवश्यक तेथे उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य कार्यवाही करणे.

७) व्यवस्थापनाची हि प्रक्रिया होत असताना स्वंयसेवी संस्थेकडे उपलब्ध असलेल्या साधनांचा योग्य व परिणामकारक वापर होतो आहे हे पाहण्याची जबाबदारी व्यवस्थापकावर असते स्वयंसेवी संस्थेकडे व पर्यायाने व्यवस्थापकाकडे, सामान्यपणे चार प्रकारची साधने उपलब्ध असतात.
🔹मानव संसाधन
🔹वित्तीय/ आर्थिक साधने
🔹जड संपत्ती
🔹माहिती
८) स्वयंसेवी संस्थे जवळ उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा योग्य व परिणामकारक वापर करून उद्दिष्टे साध्य करणे आवश्यक असते. तसेच कमीत कमी साधनांचा वापर व जास्तीत जास्त उद्दिष्टे साध्य अशी सततची तारेवरची कसरतही करीत राहावे लागते. उद्दिष्टे साध्य करताना आणि साधनांचा वापर करताना लोक, काम व क्रिया यांचे यथायोग्य व्यवस्थापन करावे लागते आणि म्हणून हि तारेवरची कसरत करताना स्वयंसेवी संस्था व व्यवस्थापक यांना नियंत्रणाकडे व विशेषकरून अंदाजपत्रकाकडे लक्ष द्यावे लागते कारण अंदाजपत्रकीय आढावा व कार्यप्रणाली, नियंत्रण व संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्याची क्षमता यात अतिशय जवळचा संबंध आहे.

 नियंत्रण व अंदाजपत्रक कशासाठी ?

९) या आधी उल्लेख केल्याप्रमाणे स्वयंसेवी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविद साधनांचा वापर करावा लागतो आणि त्या साधनांचीही काही वैशिष्टे आहेत.
▶️पहिले वैशिष्ट असे कि साधने हि नेहमीच दुर्मिळ असतात.
▶️दुसरे वैशिष्ट असे कि साधनांचा पर्यायी वापर होऊ शकतो.
▶️तिसरे वैशिष्ट असे कि साधनांसाठी काही तरी किंमत मोजावी लागते.
आणि म्हणूनच साधनांचा वापर कसा करावयाचा आहे हे अगोदर ठरविण्यासाठी अंदाजपत्रकाची आवशक्यता आहे. तर अंदाजपत्रकाप्रमाणेच वाटचाल चालली आहे न हे निश्चित करण्यासाठी नियंत्रणाची आवश्यकता असते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular