MNDA भाग ६
ऑडीट म्हणजे काय? :-
ऑडीट म्हणजे हिशोबाची पुस्तके तपासण्याचे अधिकृत/ सरकारी काम होय. ऑडीट करताना चार्टर्ड अकौटंट साधारणपणे अवैध, बेकायदेशीर वा गैरवाजवी खर्च; स्वयंसेवी संस्थेला मिळणार असणारी रक्कम, इतर मालमत्ता किंवा परत मिळणाऱ्या रकमेत काही चुकवाचूकव आहे का हे बारकाईने पाहतो. पैशाचे वा मालमत्तेचे नुकसान, उधळपट्टी आहे का हे तपासतो. अशा परिस्थितीत विश्वस्त वा इतर कोणीही व्यक्तीच्या गैरवर्तवणुकीने विश्वासघाताने वा दुरुपयोग करण्याने हे नुकसान वा उधळपट्टी झाली आहे का हे चार्टर्ड अकौटंटने नमूद करणे आवश्यक आहे. कॅशबुकमधून लेजरमध्ये योग्य नोंदी झाल्या आहेत का, बिलांसह व्हाउचर्स, योग्य त्या स्वाक्षऱ्या आणि मुखत्यार पत्र ठेवले आहे का तसेच बँकेतल्या रकमेचा ताळा जमतो आहे का नाही हे चार्टर्ड अकौटंट तपासतो. खालील गोष्टीही तो तपासतो – पावती पुस्तके, कॅशमेमो पगाराचे रजिस्टर, मालमत्तेचे रजिस्टर, विक्री रजिस्टर, नोंदणी पुस्तके, गुंतवणुकीचे प्रमाणपत्र, चेकबुक, पासबुक (किंवा बँकेची निवेदने), रकमा जमा केल्याच्या स्लिप्स.
…………………………………..
राज्यस्तरीय धर्मादाय आयुक्त किंवा संस्थासाठीचे रजिस्टर यांच्याकडे दरवर्षी परतावा भरला पाहिजे. केंद्रीय स्तरावर प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडे आणि स्वयंसेवी संस्था परकी मदत कायद्याखाली नोंदणी केलेली असली तर गृहमंत्रालयाकडे परतावा पाठवला पाहिजे.
- माहिती संकलन : युवराज येडूरे, अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत
मुख्यसंपादक