Homeवैशिष्ट्येभाग 7 स्वयंसेवी संस्थांसाठी हिशोब व्यवस्था काही उपयुक्त सूचना

भाग 7 स्वयंसेवी संस्थांसाठी हिशोब व्यवस्था काही उपयुक्त सूचना

MNDA ✒️भाग 7
स्वयंसेवी संस्थांसाठी हिशोब व्यवस्था* *काही उपयुक्त सूचना (करा किंवा करू नका)
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
▶️ रोखपालाने स्वतःचा रोज खर्च नियमितपणे ठेवणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रत्येक आलेली रक्कम व गेलेली रक्कम नोंदवणे जरुरीचे आहे.
▶️ रोज खर्चावरील शिल्लक दिवसाच्या शेवटी काढण्यात यावी व हातातील शिल्लक रोज खर्चावरील अखेरच्या शिल्लकेशी तंतोतंत जुळते आहे न हे पाहणे जरुरीचे आहे.
▶️ हातातील शिल्लक व रोज खर्चावरील रक्कम त्यात तफावत आढळल्यास हि गोष्ट वरिष्ठांच्या निदर्शनास सत्वर आणणे जरूरीचे आहे.
▶️ वरील गोष्टींचे पालन झाल्याखेरीज रोखपाल व वरिष्ठ अधिकारी यांनी संस्थेचे कार्यालय सोडू नये. दर दिवशी रोखपालाने रोज खर्चावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.
▶️ दररोजच्या रोख शिल्लकेची नाणेवारी करून ती रोजखर्चावर लिहिण्यास विसरू नये.
▶️ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शक्यतो दररोज किंवा काही ठराविक दिवसांनंतर हातातील शिल्लक व रोज खर्चाप्रमाणे दर्शवलेली शिल्लक यांचा मेळ घ्यावा व रोज शिल्लक स्वतः मोजून पहावी व शिल्लक प्रत्यक्ष मोजल्यासंबंधीचा शेरा रोज खर्चावर लिहून आपली स्वाक्षरी करावी.
▶️ रोजची शिल्लक तिजोरीत कॅशबॉक्स मध्ये ठेवून त्याची एक किल्ली वरिष्ठ अधिकाऱ्यांजवळ ठेवावी. कॅशबॉक्स दर्शनी भागात न ठेवण्याची दक्षता घ्यावी.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*लक्षात ठेवा* – हातातील रोख शिल्लकेची हाताळणी व रोखीचे व्यवहार काळजीपूर्वक न झाल्यास संस्थेच्या आर्थिक व्यवहारात गलथानपणा येण्यास वेळ लागत नाही आणि त्यामुळे संस्थेची समाजातील विश्वासाहर्ता गमावली जाते. ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे , अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular