Homeवैशिष्ट्येभाग-9 बँकखाते

भाग-9 बँकखाते


MNDA भाग:-9
बँकखाते
अ ) संस्थेच्या कार्यालयाजवळ असणाऱ्या बँकेतच खाते उघडण्यात यावे . लांब अंतरावरील बँकेत खाते उघडणे वेळेच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने अयोग्य असते .
ब ) बँकेचे व्यवहार कोणत्याही परिस्थितीत एकाच व्यक्तीच्या स्वाक्षरीने करण्यात येऊ नयेत . बँक खाते व्यवहार कमीत कमी दोन व्यक्तींच्या स्वाक्षरीने करण्यात यावेत . यासाठी संस्थेचे अगर कार्यकारी मंडळाच्या योग्य त्या ठरावाद्वारे योग्य त्या व्यक्तींना बँक खाते चालविण्याचा अधिकार देण्यात यावा .
क ) बँकेचे व्यवहार फक्त क्रॉस चेक द्वारे करण्यात यावेत . बेअरर चेकचा वापर फक्त ऑफीस खर्चासाठी लागणारी रक्कम काढण्यासाठी करावा . इतर फक्त क्रॉस चेक अगर डिमांड ड्राफ्टद्वारेच करण्यात यावा ,
ड ) प्रत्येक महिन्याच्या शेवटी बँकेतून खाते उतारा आणून बँकेतील शिल्लकेचे ताळमेळ पत्रक तयार करावे . न वटलेले चेक इत्यादीसंबंधी आवश्यक ती चौकशी करून योग्य ती कारवाई करावी , असे ताळबंद पत्रक दरमहा करणे अत्यंत आवश्यक व फायदेशीर आहे .
अत्यंत महत्वाचे
१ ) एखादा चेक अथवा चेकबुक वगैरे कागदपत्र गहाळ झाल्यास किंवा ती योग्य त्या व्यक्तींना न पोहोचल्याचे लक्षात आल्यास असे चेक अथवा ड्राफ्ट न वटविण्याच्या संबंधी लेखी सुचना बँकेस त्वरीत देण्यात यावी .
२ ) चेकमधील रक्कमात खाडाखोड अलिकडे बऱ्याच प्रमाणात आढळल्याचे आढळून येते . यावर खात्रीशीर उपाय म्हणजे कोणताही चेक लिहिताना त्यामागे कार्बन पेपर उलटा ठेवून चेक लिहावा . ३ ) चेक टपालाने पाठविणे झाल्यास ते रजिस्टार पोस्टानेच पाठविण्याची खबरदारी घ्यावी . ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular