नकोय हे यातनामय जीणं
करितो आता सुखाची प्रतीक्षा
भूकेची रांड मारण्यासाठी
नशीबही घेतं रोज परीक्षा
दररोज येतोय हिला माज
करिते ही पोटात वळवळ
उध्दार कराया आम्हा
काढेल का कुणी एखादी चळवळ
गर्दी जमली बघ्यांची
खेळ करण्या माझा
कुणी आहे सभ्य तर कुणी गांडू
देतं कुणी पैसं तर कुणी म्हणतं
बा चा आहे का फुटपाथ तुझा
वासनेची करुनी हौस
त्यांनी कचरा पेटीत टाकले
चार दिन की जिंदगी
जहरी या अनुभवातून
आज कलेने या तारले
षंढ या समाजानं
बालमजूर म्हणून छळले
अन् भूक नावाच्या रांडेनं
आज उपाशी मारले…!
- संदीप देविदास पगारे
खानगाव थडी नांदूर मध्यमेश्वर-नाशिक
मुख्यसंपादक