Homeआरोग्यभ्रूण हत्या

भ्रूण हत्या

जन्म घ्यायला आई पाहिजे….
घर सांभाळायला पत्नी पाहिजे….
अधिकार गाजवायला बहीण पाहिजे….
लाड करायला आज्जी पाहिजे….
प्रेम करायला प्रियेसी पाहिजे….
मनातलं हितगुज साधायला मैत्रीण पाहिजे….
पण दादा म्हणे, वंशाला दिवा मुलगाच पाहिजे…
ज्योतच पेटवली नाही घरात तर दिवा येईल कुठून….
असं कसं चालेल रं दादा…
वंशाच्या दिव्यासाठी अनेक भ्रूण हत्या केल्या…
देव्हारातल्या लक्ष्मीला नवस दादानं केला….
अन घरच्या लक्ष्मी मसनवट्यावर नेल्या….
वंशाचा दिवा होईल जेव्हा मोठा….
कंबरत लात घालून करील हिशोब चुकता…
कर की रं दादा माणूस म्हणून विचार…
पणतीच विझवली तर कुठून येईल प्रकाश…
तिलाही झगमगूदे तूझ्या उंबरठ्यात….
नाव तुझं गाजवेन उभ्या जगात….
अभिमानाने छाती तुझी येईल भरून….
तूझ्याच ज्योतीचा प्रकाश बघून डोळे जातील रं दिपून….

      ✍️ सुनीता खेंगले

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular