Homeमुक्त- व्यासपीठमनाच्या गाभाऱ्यातील अष्टपैलू रंगाची होळी

मनाच्या गाभाऱ्यातील अष्टपैलू रंगाची होळी

        
            सृष्टीकर्त्याने सृष्टी निर्माण करताना अप्रतिम रंगाची उधळण करून ह्या सृष्टीची रचना केली.... त्याच्या या कलाकृतीचे वर्णन करण्यासाठी शब्द सुद्धा अपूर्ण पडतील, इतके अप्रतिम, आवर्णनीय रंग करनकरावन्हार विधात्याने भरलेत.... मनाला भुरळ पडणारा हिरवा निसर्ग, निळे अंत नसलेले आकाश, सोनेरी किरणांनी सृष्टीचे पालनपोषण करणारा धगधगता सूर्य, पंधरा शुभ्र चंद्र जो आपल्या शीतल किरणांनी धरतीवर पसरलेल्या काळ्या अंधाराला प्रकाशित करतो, चमचमणाऱ्या चांदण्या, रंगविरहित पर्जन्य आणि मन धुंद करणारा मातीचा सुगन्ध , मन मोहून टाकणाऱ्या रंगाचे विविध पशुपक्षी, प्राणीमात्रा .....

            याहून सगळ्यात सुंदर कलाकृती म्हणजे मनुष्यप्राणी, जो ह्या सर्व रंगांचा मनसोक्त उपभोग घेऊ शकतो,  त्याची उधळण करु शकतो....भगवन्ताने मानवाला मन आणि बुद्धी देऊन ह्या सृष्टी रंगमनचावर जन्माला घातले.....ज्याच्या जोरावर मानव आपल्या जीवन प्रवसात मनाला वाटतील ते रंग आपल्या जीवनात भरून आयुष्याचा प्रवास रंगीबेरंगी करु शकतो....

                 आपल्या आयुष्यातला सगळ्यात धुंद बेधुंद करणारा रंग म्हणजे प्रेमरंग !... प्रेमारंगात कोणी रंगला नाही असा दुर्मिळच !....अगदी पशु, पक्षी, प्राणी सुद्धा ह्या रंगापासून अलिप्त नाही..... वाळवनटासारखं भकास, ओसाड जीवन जगत असताना अचानक कुठूनतरी एखादा कृष्ण किंवा राधा आपल्या आयुष्यात अवचित यावी आणि आपल्या हृदयावर  प्रेमाच्या रंगाचा वर्षाव करावा ह्या सारखे दुसरे स्वर्ग सुख नाही.... मुख्य म्हणजे प्रेमरंग जेव्हा जेव्हा ज्याच्या अंगावर उधळला तेव्हा तेव्हा त्या रंगात तो इतका बुडाला की परत कधी बाहेर पडलाच नाही....

           रंगात रंग तो श्याम रंग ....
           पाहण्या नजर भिरभीरते....
           ऐकुनी तान, विसरूनी भान....
           ही वाट कुणाची बघते...
           त्या सप्तसुरांच्या लाटे वरुनी....
           साद ऐकुनी होई...
    राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी....

       असा हा बेधुंद करणारा प्रेमरंग... प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा.... या रंगात भिजणारा ना कोणी गरीब ना कोणी श्रीमंत.... प्रेमाला कुठलीही जात नाही, बंधन नाही, अट नाही,वय नाही.... कधीही कुठेही कुणाच्याही मनावर अगदी अलगद याचा रंग चढतो.... विरहाचा प्रेमरंग तर सगळ्यात जास्त गडद रंगात उमटतो... जितका विरह जास्त तितकाच तो अजून सोनेरी रंगात प्रकाशित होतो.... आणि न मिळणाऱ्या प्रेमाचा रंग तर मरेपर्यंत मनावर राज्य करतो.... ह्या रंगाची छटा ज्या हृदयावर पडते ते हृदय कायमस्वरूपी त्या रंगात भिजून ओलेचिंब होत....ना मिळवण्याची धडपड ना हरवण्याची भीती....प्रेमारंगात रंगण्यापासून खुद्द भगवन्त सुद्धा अलिप्त राहू शकला नाही मग मानव तरी कसा अलिप्त.....

          कितीही अबोल असुदे रे कृष्णा तुझी प्रीत
          तुझ्या कवेत येताच स्पर्शानेच झाली प्रचित
          तुझ्या नयनाणीचं दिली ग्वाही
          तुही ह्या मीराच्या रंगात रंगल्याची ग्वाही
          कितीही बांध घातले ते दंडवण्याचे
          तुझ्या विणेनच सूर छेडले प्रगटण्याचे

         प्रेमरंगा सारखाच मैत्रीचा रंग..... एकदा चढला की कधीच ह्याचा रंग उतरत नाही....

       ज्योतीचे आणि वातीचे होता मिलन
       मैत्रीच्या रंगाची होते उधळण
       सप्त रंगाची करिता धुळवड
       नात्याची वीण होई गोडवण

          असा हा मानवी जन्म विविध रंगात रंगलेला..... जो पर्यन्त स्वतःला आतून वाटत नाही की माझे आयुष्य बेरंगी झालय तोपर्यंत कुणीही आपले आयुष्य बेरंगी करु शकत नाही....फक्त शर्थ एकच की आपलं जीवन रंगानी रंगवत असताना इतर कुणाच्याही आयुष्याचे रंग आपल्यामुळे बेरंग होऊ नये....

सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • सुनीता खेंनगले

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular