त्या नभाआडून आज पाहीला
चंद्र मी सखे तूला चोरून बघताना
कसलीही बेडी नाही तरीही अडखळतो
पाय माझा तूझ्या दारुन चालतांना
प्रथम दर्शनी तू भासली मला
अप्सरा की उतरली परी स्वर्गातली
लावण्य तूझे मोहवीते मजला
तूच लावण्यवती माझ्या स्वप्नातली
अजोड सौंदर्य तूझ्यात दिसते
बटा अलगद गालावरी खेळतांना !१!
आकृष्ट झालो भ्रमरा सारखा तझ्या
कडे वेगळा तूझा गंध सूगंध धूंद
पोर्णीमेचा चंद्र ग तूझा दिवाना, मधूर
धून तू संगीताची, लागला तूझाच छंद
मनमोहक अदा तूझी झीरपलो
तूझ्यात प्रिये, तूला न्याहाळताना !२!
तूझा यौवन दरबार श्रीमंतीचा
फिका वाटतो ग श्रावणातला बहार
हिरमुसलेले मन माझे तूला पाहून
वसंत फुलला , तूच माझे जिवन सार
तूळसी सारखी पूज्यनीय पवित्र तू
अवघडतो मी मला तूझ्यात शोधताना !३!
- जगन्नाथ काकडे
मेसखेडा
मुख्यसंपादक