महात्म्या नम्र तुज वंदना
महात्म्या नम्र तुज वंदना
अज्ञानाची धुके अवतीभवती
सामान्य जात्यात चाचपडती
तू भेदुनी ती भीती ,त्या भिंती
दावीसी तूं नितनव मार्गा
महात्म्या नम्र तुज वंदना -१
तु रण हे छेडीयले
दुष्परंपरांना रोखिले
लोक मानसा उन्नत केले
सोसल्या त्वा किती वेदना
महात्म्या नम्र तुज वंदना – २
संसाराचे पट ना मांडीले
समाजोन्नतीचे मार्ग धुंडीले
म्लान अनिष्ट ते गाडीले
नवउन्मेषाची नित भावना
महात्म्या नम्र तुज वंदना – ३
काळाच्या पुढील तुझे व्यवधान
सर्वसामान्यावरही अवधान
झुंजीशी जरी काळाचे आव्हान
दिली जागृती सत्याचा वाणा
महात्म्या नम्र तुज वंदना – ४
विचारां नसे काळाच्या सीमा
भविष्याती नकाशाच्या दिशा
तू काळाच्या उदरातील उषा
बदलशी युगाच्या दशा
महात्म्या नम्र तुज वंदना – ५
- राजेंद्र गुरव (यमाई औंध,सातारा )
मुख्यसंपादक
म.फुले जयंती : अभिवादन