आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरू पौर्णिमा तसेच व्यास पौर्णिमा म्हणतात ! प्रथमतः गुरूंना वंदन करूया !
आपल्या भारतीय परंपरेत अनेक गुरू – शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत …आपण ज्यांच्या कडून विद्या प्राप्त करतो , त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्याचा हा दिवस !
पौर्णिमा म्हणजे प्रकाश
तर आपल्या जीवनाची बाग कोणामुळे प्रकाशमय झाली त्यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त करण्याचा हा दिवस ! गुरू शिष्याला ज्ञान देतात
गुरू म्हणजे ज्ञानसागर !
प्रथम आपण गुरू या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया !! ‘गु’– अंधकार
आणि रु म्हणजे नाहीसा करणे ….तर आपल्या जीवनातील अंधार दूर करून प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करणे …आणि हा मार्ग आपल्याला गुरूंच्या आज्ञेवरून गवसतो ! तर असो माझ्या जीवनाच्या अनेक टप्प्यावर मला अनेक गुरू भेटले ….प्रथमतः माझे पाहिले गुरू ….माझे आई – बाबा ज्यांच्यामुळे मला या सृष्टीचा आनंदाचा मार्ग दिसला….जन्मापासून संस्काराचे बाळकडू मिळाले . दुसरे शाळा , कॉलेजचे गुरुवर्य महोदय!
ज्यांच्यामुळे मला व्यवहार दृष्टी , साक्षरता प्राप्त झाली ….तसेच माझा नवरा , मित्र मंडळी , नातेवाईक यांनी संकटप्रसंगी माझ्या पाठीवर आश्वासक हात फिरवला ….भक्कम पाठिंबा दिला ! जीवनाची लढाई लढण्यास बळ दिले ….
असे अनेक गुरुप्रति मी आदर व्यक्त करते ……!
सृष्टीतील अनेक पक्षी – प्राणी , निसर्ग यांच्याकडून मी बरेच काही शिकले …जशी नदी वाहत जाऊन सागराला मिळते पण ती जिथून वाहत जाईल तिकडे आपल्या पाण्याची बरसात करून सृष्टी , झाडे झुडपे फुलवते ! …
मानव , प्राणी यांची पाण्याची गरज भागवते या गुरुलाही माझा प्रणाम
….छोटीशी एक गोष्ट चिमणी आपल्या पिल्लांना चोचीतून दाणे भरवताना मी पाहिले अन नकळत माझ्यात आई आपल्या मुलांवर कसे प्रेम , संस्कार , जपणूक करते याचा धडा मिळाला
ही चिमणी ही माझ्याप्रति गुरू ! …म्हणजेच ज्यांच्या कडून एखादी गोष्ट , कला
ज्ञान आपण अवगत करतो हे सर्व आपले गुरू
यात अगदी सीमेवर लढणारे सैनिक , तसेच पोलीस, डॉक्टर , शास्त्रज्ञ असा अनेकांचा वाटा आहे ! तर या सगळ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस एक निमित्त !
या सर्व गुरूंचे आशीर्वाद आपल्या मनाला प्रचंड उभारी , आत्मविश्वास देतात !
आपण जे शब्द उच्चारतो
ते ही आपले गुरुचं !
आणखी एक , माझा देव ! त्यांचे आशीर्वाद पाठीशी असल्याशिवाय कोणतीच गोष्ट साध्य होत नाही ! ....फक्त या देवांचा आदेश असा की स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा ! आम्ही तुमच्या पाठीशी कायमच आहोत
माझ्या मते सत्याची कास धरून चालणाऱ्यांच्यामागे
देव ठाम उभा असतो . उगाच देवाला नवस , उपास – तपास करून वेठीस धरू नका ….!
शेवटी काय तर चार दिवस सुखाचे तर चार दिवस दुःखाचे . प्रत्येकाच्या आयुष्यात बॅड पॅच असतो . पण या वर मात करून जो फिनिक्स भरारी घेतो त्याच्या पाठीमागे देव असतो .
असो , जीवनाच्या या टप्प्यावर ज्यांच्याकडून मला चांगले शिकायला मिळाले त्यांना माझा प्रणाम !
*गुरू देई ज्ञानाचा सागर माता देई संस्कार बाळकडू ! बाप देतो भक्कम आधार ! भावंडांपासून मिळते प्रेम
माया ! मित्र देतात आश्वासक आधार ! संगीत देते प्रचंड ऊर्जा !
साहित्य देतो जगण्यास चेतना !
अशाप्रकारे गुरूंच्या
आशीर्वादाने आयुष्याचा अर्थ कळतो ! मागे वळून पाहताना आणि ते जगावं मात्र लागतं … पुढे बघून …..!
- सौ.राजश्री भावार्थी
पुणे
मुख्यसंपादक