सुगंधी टवटवीत फुलावाणी सदा बायको हसत जा
निरागस मन हेलवणार हसू ओठांवरती ठेवत जा
झोपाळ्यासंगे वाऱ्यासोबत दूर आकाशी झेपावत जा
पण तू ना आशू माझ्यासंगे जशी आहेस तशीच रहा..।1।
प्रेमधागा निसर गाठीने आशा आपला घट्ट आवळीत जा
चिडकू कांद्या लुटूपुटू भांडण माझ्याशी तू खेळत जा
तात्विकवाद गल्लीभर जावो घडीभरात मिटवत जा पण तू ना आशू माझ्या संगे जशी आहेस तशीच रहा..।2।
जाणाऱ्यांना बेशक जावो दूर पाठलाग सावली तू बनत जा थकून किती आलो आसक्या गोड हसू दाखवत जा
राग केव्हा येत असेल माझा मायेने पोटात घालत जा
पण तू ना आशू माझ्यासंगे जशी आहेस तशीच रहा..।3।
जोडीचं आपली न्यारी आहे जगाला धने दाखवत जा
धनी कोथिंबीर म्हणावा एवढं मसाला जीवनात भरत जा
आकांक्षांच्या पंखांना तुझ्या बळ हत्तीचं देत जा
पण तू ना आशू माझ्यासंगे जशी आहेस तशीच रहा..।4।
सासूसह तुझ्या आईसारखं तुरळक खडाजंगी करत जा
पुस्तकातली सावित्री मुलांना अभिमानानं दाखवत जा
अन्याय विरुद्ध शड्डू ठोकोन लक्ष्मीवाणी लढत जा
पण तू ना आशू माझ्यासंगे जशी आहेस तशीच रहा..।5।
✍ कृष्णा शिलवंत
मुख्यसंपादक