Homeमुक्त- व्यासपीठमी आनंदाने दु:खालाही मिठी मारली आहे

मी आनंदाने दु:खालाही मिठी मारली आहे

मी आनंदाने दु:खालाही मिठी मारली आहे,
लाख संकटांना अशीच धूळ चारली आहे..

ह्रदयाची जागा सुध्दा राहिली नाही सुरक्षित,
कुण्या मांत्रिकानी मूठ मारली आहे..

उगवतीलच कसे या आयुष्यात काटे ?
आजन्म मी फक्तं फुलं पेरली आहे..

कशी सांभाळावी माझी झोपडी आता ?
तुझी वावटळ घरात शिरली आहे..

भेटलो होतो ज्या रुक्ष बागेत आपण एकदा,
तेंव्हापासून ती बाग ही बहरली आहे…!!

- प्रविण घुले 
( कोळसांगवी ) 

Previous article
Next article
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular