Homeमुक्त- व्यासपीठराजकारणाचे पायाभूत उद्देश!

राजकारणाचे पायाभूत उद्देश!

प्रजेचे कल्याण व प्रजेची सुरक्षा हे दोनच राजकारणाचे पायाभूत किंवा प्रमुख उद्देश आहेत. हे उद्देश पार पाडण्यासाठी मिळणारा सर्वोच्च कायदेशीर अधिकार अर्थात सत्ता ही या उद्देशपूर्तीचे साधन असते. सत्ता हे साध्य नव्हे तर ते साधन आहे.

सुनियोजित अर्थव्यवस्था हा प्रजेच्या कल्याणाचा मार्ग आहे व सुनियंत्रित शासनव्यवस्था हा प्रजेच्या सुरक्षेचा मार्ग आहे. शिक्षण, रोजगार व तसेच आरोग्य या प्रजेच्या कल्याणकारी सुविधा आहेत व अर्थव्यवस्थेचा अंग आहेत. तर नागरी, पोलीस, लष्करी प्रशासन व या तिन्ही प्रशासनावर कायद्याचा अंकुश ठेवणारी स्वतंत्र न्याययंत्रणा या प्रजेच्या सुरक्षेच्या व्यवस्था आहेत व शासनव्यवस्थेचा भाग आहेत.

मग धर्म काय आहे? तर धर्म ही समाजात नैतिकता व भाईचारा निर्माण करणारी संस्कृती आहे. या संस्कृतीत देव ही एक काल्पनिक आधार व मानसिक समाधान देणारी संकल्पना आहे. पण कोणत्याही धर्मातून देव प्रत्यक्षात बाहेर पडत नाही. खरं तर देव हा निसर्गाच्या प्रत्यक्ष स्वरूपात सर्वांच्या समोर उभा आहे. हे स्वरूप मऊ नाही तर ओबडधोबड आहे. याचा अर्थ देव हा ओबडधोबड आहे व कोणताही धर्म त्याला मऊ करू शकत नाही. ही गोष्ट नीट समजून घेतली तरच मग सर्वधर्मसमभाव ही संकल्पना लोक स्वीकारतील व एकमेकांच्या धर्माचा आदर करून सर्व धर्माच्या संस्कृती उत्सव सोहळ्यात विश्वास व आनंद या दोन्ही भावनांनी नक्की सहभागी होतील. मुळात समाजात तिरस्कार, तेढ निर्माण करणारा धर्म हा धर्मच नव्हे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी.

  • ॲड.बी.एस.मोरे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular