Homeवैशिष्ट्येराजगड सोहळा…

राजगड सोहळा…

            शिवरायांच्या पावलांनी पावन झालेला राजगड आज दिमाखात सजून आसमंती ख्याती पसरवून उभा आहे.

संपूर्ण देशातल्या दुर्गसेवकांनी उराशी बाळगलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे. प्रत्येक मावळा रुपी दुर्गसेवक/दुर्गसेविका आजच्या दिवसासाठी गेल्या कैक महिन्यांपासून मेहनत करीत होते, झटत होते. स्वतःच्या हातातले काम बाजूला सारून हे मावळे दुर्गसंवर्धन असूद्या किंवा सोहळे असूद्या आनंदाने गडाच्या पायथ्याशी येऊन शिवरायांच्या नावाचा जयघोष करत नेहमीच तत्परतेने हजर राहतात.

आजचा दिवस म्हणजे सर्व मावळ्यांसाठी सोनियाचा दीन आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारणही तसेच आहे. आपल्याला साधा पाच किलोचा दगड कोणी अर्धा तास डोक्यावर घेऊन चालायला सांगितले तर आपली दैना दैना होऊन जाते. तर मग या मावळ्यांनी आपल्या घरापासून शेकडो मैल दूर येऊन सात सागवानी दरवाजे जे शे-हजार किलोचे आहेत ते वर गडावर नेऊन पोहचवले. नुसते गडावर आणले नाहीत तर त्या दरवाजांना गडाचा एक भाग बनवले म्हणजेच हे दरवाजे प्रवेशद्वाराला बसवूनही घेतले. हे सर्व दुर्गसेवकांनीच केले. परंतु हे सर्व कसे शक्य झाले. तर मनातली जिद्द आणि स्वराज्यासाठी काहीतरी करून दाखविण्याची तयारी होती म्हणून. याच जिद्दीला आणि तयारीला हवी असते ती चिकाटी, हीच चिकाटी आणि शिवरायांप्रती असलेली साधना,
या मावळ्यांच्या शरीरातल्या धमन्यांतून अविरतपणे धावत असते. याच सात दरवाजांचा आज प्रवेशद्वार महादुर्गार्पण सोहळा स्वराज्यमंदिर राजगडावर सजनार आहे.

विशेष म्हणजे या सोहळ्याचा मान सन्मान दुर्गसेवकांच्या हस्ते होणार आहे. हाच दुर्गसेवकांसाठी सगळ्यात मोठा सन्मान आहे. केलेल्या मेहनतीचे चीज आज होणार आहे. हे सर्व ज्यांच्या प्रयत्नाने घडत आहे ते आहेत, ज्यांनी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेची स्थापना केली व गडकोट राखण्याचे स्वप्न बघून ती स्वप्न सत्यात उत्रवून दाखविली. असे आमुचे 🙏गुरुवर्य- श्रमिक गोजमगुंडे सर- म्हणजेच आमचे, होय आमचेच, नेहमी आमच्यात मिसळून राहणारे, आमच्यासोबत चालणारे, आमचे मार्गदर्शक.

प्रत्यक्ष पाहताना हा राजगड आज स्वर्गाहूनही सुंदर भासेल. शिवरायांच्या चरणी माथा टेकवून, हातात भंडारा घेऊन चौफेर उधळला जाईल. जय भवानी जय शिवराय ही गर्जना नभात विरणार आहे.
जल्लोष तर होणारच, थाटामाटात सोहळा होणार, आनंदी आनंद होणार, जन्मोजन्मीची पारणे फिटनार.

हा सोहळा पाहण्या अवघे अवघे या…
🙏🚩जय शिवराय🚩🙏

✍️विजय वैशाली दत्ताराम पराडकर-आण्णा
🚩एक दुर्गसेवक🚩
🚩सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान🚩
🚩वसई विरार विभाग🚩

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular