देहाची तिजोरी या गीताच्या गीतकारांची मनापासून माफी मागून विडंबन रचना
लाजू नका कोणी,कचकाटून खावा
जाडजूड देह व्हावा जाडजूड व्हावा
भरपेट पाणी प्यावे, पण जेवल्यानंतर
शतपावली करून यावे,चालूनिया अंतर
पहाटे पहाटे रोज व्यायाम करावा
जाडजूड देह व्हावा जाडजूड व्हावा
पिऊन घे तू डोळे मिटूनी,डाळ दोन वाटी
सोबतीला अंडी आणि खारी शेव घाटी
कमीतकमी दिवसामधूनी,चार वेळा जेवा
जाडजूड देह व्हावा,जाडजूड व्हावा
रविवार येता घ्यावे मटणाचे ताट
मस्त खावी मच्छी भावा,काढूनिया काटं
जड सर्व पचण्यासाठी,बडीशेफ चावा
जाडजूड देह व्हावा,जाडजूड व्हावा
✍️श्री.विजय शिंदे…
ठाणे,(कळवा पूर्व)
मुख्यसंपादक