बाबांची लाडकी लेक मी,
लाडाने बोलतात मला माझी तु सोनपरी……….
सोन्याच्या पावलांनी आलेली,
घरी मी बाबांची भाग्य-लक्ष्मी………..
माझ्या सारखी नशीबवान मी,
लाडकी लेक बाबांची सोनपरी…………
मला लहानंच मोठं करताना,
दिवसरात्र राबुन मेहनत केली शेतामधी………..
छुमछुम पैंजणचा अवाज करत,
घरभर सार्या बागडणारी………..
माझी राजकुमारी झाली,
म्हणतात आता मोठी…………
काळजाचा तुकडा मी बाबांचा,
कधी कधी म्हणतात राजकुमारी……….
काळजाचा तुकडा माझ्या जाईल,
एकेदिवशी म्हणतात परक्या घरी…………
आज-परवा भातुकलीचा,
खेळ खेळणारी माझी परी……….
परक्या घरी जाऊन नवा स्वःताचा,
खरा भातुकलीचा संसार मांडेल माझी राजकुमारी……….
लाडकी लेक मी बाबांची,
लाडाने वाढलेली राजकुमारी………..
बाबा बोलतात येईल एकेदिवशी
तुझा राजकुमार घेऊन जाईल,
माझ्या काळजाचा तुकडा त्याच्या घरी………..
बाबांची लाडकी लेक मी,
लाडात वाढलेली सोनपरी………
नावे दिली मला खुप सारी
राजकुमारी कधी बोलतात छकुली,
मी त्याची सोन्याच्या पावलांनी आलेली घरी भाग्य-लक्ष्मी……….
कु.प्रणिता धुरी ( पनु )
ता.देवगड
जि. सिंधुदुर्ग
समन्वयक – पालघर जिल्हा