तूही एकला मी ही एकला,
उभा विटेवरी एकटा का तू विठ्ठला…
तूझी वारी आज माझ्या दारी
का तू ठेवला मला याजन्मी एकला…
अरे विठ्ठला विठ्ठला….
तूही एकला मी ही एकला,
उभा विटेवरी एकटा का तू विठ्ठला..
तूझी रखुमाई ,तुझ्या बाजूलाच राही
तरी तुम्ही एक नाही, का सांग विठ्ठला..
माझी रखुमाई माझ्या जवळच नाही
तरी युगे युगे मी वाट पाही, हे भोग मज का विठ्ठला…
रखुमाई रखुमाई तू बी का ग एकली
युगे युगे ग तूझी वाट पाही तो विठ्ठला
घे तूही पुढाकार, आता नको ग माघार
साद घालुनी तो ग विठ्ठला..
तू ही एकला मी ही एकला,
उभा विटेवरी एकटा का तू विठ्ठला..
तुझ्या चरणी देवा, चंद्रभागा धन्य झाली,
परी रखुमाई देवा, का एकटी राहिली…
तुझे भोग देवा या जन्मी मी का सोसावे..
माझ्या रखुमाई पासूनी मी का दूर व्हावे.
तुझे कोडे तुलाच सुटले नाही,
परी माझे कोडे सोडव तू विठ्ठ्ला…
तूही एकला मी ही एकला,
उभा विटेवरी एकटा का तू विठ्ठला…
माझ्या एकांताच्या झळारोज तूच पाही…
रोजच झुरत झुरत मरणे कसे जाणतो तू सर्वकाही…
मी ही युगे युगे आजही तिचीच वाट पाही..
तुझी मात्र युगे युगे गाठा भेट नाही…
सर्वस्वी तूच जाणतो सारे तरी
माझी चूक काय सांग विठ्ठला…
तूही एकला मी ही एकला
उभा विटेवरी एकटा का तू विठ्ठला…
– कवी अनिकेत शिंदे
मुख्यसंपादक