व्यवसायात कर्ज घेण्यात काहीच वावगं नसतं. कर्जाचं दडपणही बाळगायचं नसत. फक्त कर्ज व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात न घेता तो स्थिरस्थावर झाल्यानंतर ज्यावेळी त्यात वृद्धी करायची असेल त्यावेळी घेणे कधीही योग्य. सुरुवातील व्यवसाय सेट नसल्यामुळे हफ्ते फेडायचे कि व्यवसाय सांभाळायचा याच टेन्शनमध्ये दिवस ढकलावे लागतात. व्यवसाय स्थिरस्थावर झाल्यानंतर आपल्या हाती मार्केट असतं, मार्केटचा अंदाज असतो, घेतलेले कर्ज कसे फेडायचे याचा प्रॅक्टिकली आखलेला प्लॅन तयार असतो, अशावेळी ते कर्ज फेडण्याचे दडपण येत नाही, आणि व्यवसाय सुरळीत असताना हफ्ते फेडण्यात काही अडचण येत नाही. सुरुवात शक्यतो हाती असलेल्या पैशाने करावी आणि तीन वर्षानंतर बँकेच्या पैशाने व्यवसायात वाढ करावी. ITR, बँक अकाउंट व्यवहार, CIBIL असे आर्थिक रेकॉर्ड चांगले असेल तर व्यवसायासाठी कर्ज सहज मिळते.
कर्ज मुदतीआधी फेडलेच पाहिजे असे काही नसते. तसे ते मुदतीआधी फेडायचेच नसते. रेग्युलर कर्ज असेल तर त्याचे हफ्ते वेळेवर फेडावेत, पूर्ण कर्ज मुदतीआधी फेडण्याची घाई करू नका. त्याने फायदा होण्याची शक्यता काहीच नसते, पण बिनकामाचे आर्थिक दडपण वाढू शकते. बँकेचं जेवढं व्याज असतं सामान्यपणे तेवढाच पैशाचा अवमूल्यनाचा दर असतो. म्हणजे व्याज धरून आपण ज्यावेळी ३-५ वर्षांनी सगळे कर्ज फेडतो ते मूल्याच्या हशोबत आपण जेवढे घेतले आहे तेवढेच आपण परत करत असतो. त्यामुळे डोक्यावर जार्ज आहे याच दडपण घेऊ नका. हफ्ते मात्र थकू देऊ नका. अशावेळी आपल्या CA चा सल्ला घ्यावा. CA सोबत सल्लामसलत केल्याशिवाय असे मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका.
CC लोन, इतर इमर्जन्सी फंड हे इमर्जन्सी फंड म्हणूनच वापरायला हवेत. ते आणीबाणीच्या परिस्थिती कामी यावेत म्हणून असतात. त्याचा व्यवसायातली गुंतवणूक म्हणून वापर करू नये, किंवा रेग्युलर खेळत्या भांडवलात वाढ करण्यासाठी उचलून तिथे टाकू नयेत. यामुळे आपला इमर्जन्सी फंड कमी होतो आणि आणीबाणीच्या परिस्थितीत इतर मार्गांनी, काही वेळा जास्तीच्या व्याजदराने ,पैसे उचलण्याची वेळ येऊ शकते, ज्यामुळे आपण आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. इमर्जन्सी फंड हा फिरता राहिला पाहिजे.
पैसा ज्या कामासाठी घेतला आहे त्यासाठीच वापरावा. व्यवसायातून पैसा बाहेर काढू नये, किंवा इतर ठिकाणी वळवू नये. आपल्या व्यवसायाची कर्ज फेडण्याची क्षमता हि त्याचवेळेस परफेक्ट असते ज्यावेळी तो पूर्ण क्षमतेने कार्यरत असतो. जर त्यातला पैसा बाहेर काढला आणि इतर ठिकाणी वळवला तर आपल्या व्यवसायाची कार्यक्षमता कमी होईल आणि तो अडचणीत येईल. व्यवसायातली मुद्दल कधीही बाहेर काढू नये. आणि नफ्यातील काही हिस्सा तुम्हाला घेऊन राहिलेला पैसा सुद्धा व्यवसायातच राहिला पाहिजे, ज्यामुळे त्याची वाढ योग्य पद्धतीने होत राहील.
- संकलन – टीम लिंक मराठी
मुख्यसंपादक