‘ शिक्षक ‘
इवल्याश्या चेहऱ्यावरील निरागस अबोल भाव टिपतो तो -शिक्षक….
शिक्षक हा कधी शिक्षक नसतोच बिचारा….
अज्ञानरूपी चिखलाच्या गोळ्याला
ज्ञानाचा आकार देणारा असतो तो-कुंभार….
आपल्या अध्यापनातून ज्ञानाची छाप टाकून ज्ञानाचं तेज सर्वदूर पसरवनारा असतो तो-सुर्य….
आपलं कुटूंब सोडून चिमुकलं जेव्हा आईचं बोट धरून रडत-रडत शाळेत येतं ना,तेव्हा त्याला कडेवर घेवून लाडानं कुरवाळून शाळारूपी परीवारात सामावून घेतो तो-शिक्षक….
वेळप्रसंगी नाचतो, बनतो विदूषक,कधी घेतो हातात छडी,तर कधी होतो त्यांची आई देखील तो असतो-शिक्षक…..
शिकवता शिकवता कधी पांढऱ्या
पावडरमध्ये जोकर बनून भान विसरून जातो ना
तो असतो-शिक्षक……
असा ज्ञानाचा,नैतिक मुल्यांचा थोर तत्त्वज्ञानाचा पुरस्कर्ता
अपूर्णाला पूर्णत्वाकडे नेणारा पावित्र्याचा जिव्हाळ्याचा एक रम्य कोपरा म्हणजे -शिक्षक….
-सौ.भाग्यश्री शिंदे (मोरे)आपेगांवकर
ता.अंबेजोगाई,
जि.बीड.
मुख्यसंपादक