Homeमुक्त- व्यासपीठशेवटी तुझं नाव लिहलं आणि कविता विद्रोही झाली...

शेवटी तुझं नाव लिहलं आणि कविता विद्रोही झाली…

नामा लय प्रयन्त केले,तुझ्या सारखी,
विद्रोही कविता लिहिण्याची
तुझ्या सारखी विद्रोही कविता
मला लिहायला नाही जमली
शेवटी तुझ नाव लिहिल
अन कविता विद्रोही झाली…….

नामा तुझी समाजव्यवस्थेची चीड पाहून
मी ही हातात लेखनी घेतली
गांडू,लवडा,शब्द लिहिण्याची
खरच नामा मला भीती वाटू लागली

काय निडर तुझी लेखनी होती
काय तुझ्यातला तो निर्भीडपणा होता
माझ्यात आजून तेवढी,ताकद नाही आली
तुला वाचल्यावर नामा
माझी लेखनीच बेडर झाली

कच्च्या कच्च्या तू वार केलेस
धर्माचा अन जातींच्या गांडीवर
हंटरचे फटके मारलेस
कसा भिला नाहीस तू,मनुवाद्याना
कसा तुझा हात थरथर कापला नाही
“माणसाने”ही कविता लिहिताना

नामा माझ्यातला पँथर तू जागा केलास
नामा तूच मला शिकवलस
धर्माची पाने वाचून झाल्यावर काय करायच,
माणूस म्हणून जगताना,
जिंदगीच नाव काय ठेवायच,,,

तुझा वारसा पुढे घेऊ जाणार
तुझ्या लेखणीला पुन्हा जिवंत करणार
घालू दे या छाताड्यावर हजार गोळया
किंचितही मागे सरणार नाही
मेलो तरी बेहत्तर
पण कुणाचा गुलाम म्हणून जगणार नाही

नामा “गोलपीठा”वाचताना,
अंगावर शहारे येतात माझ्या
लेखणीच्या जागी हातात तलवार घेऊ वाटते
दिसेल त्याची कत्तल करु वाटते,
अन्याय करणाऱ्याच्या बोकांडी बसून
नामा तू पुन्हा आला,
साऱ्या जगाला ओरडून सांगू वाटते

    ✍️राजू गायकवाड(कविराज)
उस्मानाबाद
     

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular