Homeमुक्त- व्यासपीठसंवाद मनाचा ठाव हृदयाचा

संवाद मनाचा ठाव हृदयाचा

“आयुष्य…. ऊन सावल्यांचा खेळ”

          जीवन जगत असताना अनेक परिस्थितीतून आपल्याला मार्ग काढावा लागतो. कधी सुखद फुलांचा झोपाळा तर कधी दुःखद फांद्यांचे काटे. 
          कधी कधी सगळं खूप छान चालू असतं अगदी मनासारखं दुसऱ्याच क्षणी अवकाळी पावसासारखं एखाद संकट आपल्यावर कोसळतं. अगदी अचानक आलेल्या त्या संकटातून सावरायला आपल्याला तितकाच जास्त उशीर लागतो. 
       आयुष्यात नात्यांना धरून चालावं लागतं. एखादं नातं किती सुंदर निस्वार्थ भावाने टिकवलं जात असताना अचानक त्या नात्यात गैरसमज म्हणा किंवा मिच का बोलावं, मिच का नातं निभवावं या "मी" पणामुळे नात्यात दुरावा निर्माण होत असतो. अशा अनेक गोष्टींमुळे आयुष्याची घडी विस्कळीत होत जाते. 
        आपण जोपर्यंत उन्हाचे चटके सहन सहन करणार नाही तोपर्यंत आपल्याला सावलीचे किती महत्व आहे हे समजत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यात दुःख सहन करणार नाही तोवर आपल्याला सुख म्हणजे काय असतं हे समजत नाही. 
        म्हणून या ऊन सावल्यांचा खेळात आयुष्य जगत असताना कधी कधी अचानक ऋतू बदलावा आणि तपत्या उन्हात पावसाची सर अलगद येवुन मनाला स्पर्शून जावी, अशी एखादी घटना घडली तर ती आयुष्यभर आपल्या मनात कायम घर करून जाते. 

आयुष्य म्हणजे नुसता ,
ऊन सावल्यांचा खेळ…
कितीही केली तडजोड तरी ,
नाही बसत नशिबाचा मेळ….!!१!!

ऊन सावल्यांचा या खेळात ,
यावी अलगद श्रावण सर…
स्पर्शून जावी तना मनाला ,
हर्षित व्हावं मन क्षणभर…!!२!!

आयुष्याचा प्रवास होतो ,
सुख दुःखाच्या वळणावर….
सदैव झुलतो अहंकार हा ,
नात्यांच्या नाजुक धाग्यावर…!!३!!

का कुणास ठाऊक नाही ,
अश्रू झाले आज अनावर…
लपवावे दुःख किती ,
अव्यक्त भावनेच्या जोरावर…!!४!!

हर्षा ज्ञा. गांजरे ( लोहे )
नागपूर…

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular