MNDA भाग १
विश्वस्ताची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या व प्रशासकीय जपणूक आणि देखरेख
(किंवा ना-नफा तत्वावरील व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या)
समाजकार्य / स्वेच्छेने केलेली सेवा हे सर्व विश्वस्तपणाचे अध्यहत तत्व आहे. म्हणूनच कायद्याने विश्वस्ताला स्वतःच्या पदाचा वापर स्वहितासाठी, स्वलाभासाठी, करायला प्रतिबंद आहे.
▶️ पद सांभाळायला सुरुवात केल्यावर त्या व्यक्तीने स्वयंसेवी संस्थेचे ध्येय, उद्धिष्ट आणि तिचे स्वरूप याची पूर्ण माहिती करून घ्यावी. सनद/ घटनेचा बारकाईने अभ्यास करावा. (विश्वस्त करार, निवेदन, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन इत्यादीचा अभ्यास करावा) स्वयंसेवी संस्थेच्या घटनेनुसार पदाधिकाऱ्याने काय करणे अपेक्षित आहे हे समजून घ्यावे. त्या व्यक्तीने त्या घटनेनुसार काम केले नाही तर ते “विश्वासघात’’ किंवा “कर्तव्यच्युतता कर्तव्यात ह्यगत’’ या सदरात मोडेल.
▶️ जी व्यक्ती विश्वस्ताच्या पदावर आहे तोपर्यंत तिने ना-नफा तत्वावरील कसल्याही मालमत्तेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करता कामा नये. व्यक्तिगत स्वारस्य असणाऱ्या कोणत्याही कामात भाग घेता कामा नये. ह्या व्यक्तीने ज्या लाभार्थींच्या हिताचे रक्षण करायचे त्याला बाधा येईल, दोन्हीत संघर्ष उत्पन्न होईल असे काम करता कामा नये.
▶️ कोणत्याही ना-नफा तत्वावरील विश्वस्त मंडळाचे सदस्य संयुक्तरित्या किंवा वेगवेगळ्यारित्या जबाबदार धरले जातात.
▶️ एखादी सामान्य व्यक्ती जशी आपल्या संपत्तीची काळजी घेईल तशीच सदस्याने स्थावर/ जंगम मालमत्तेची काळजी घेतली पाहिजे.
▶️ विश्वस्ताने आपली कामे, कर्तव्ये, जबाबदाऱ्या, अधिकार सहविश्वस्ताकडे वा दुसऱ्या कुणीही व्यक्तीकडे सोपवता कामा नये. सर्वसाधारण नियम म्हणून कामांची कार्यवाही फारतर दुसऱ्याकडे सुपूर्त करता येईल. मात्र विश्वस्ताला काही विशिष्ट निर्णय घ्यायचा असेल तो त्याने स्वतःच्या जबाबदारीवर घेतला पाहिजे; दुसऱ्यावर सोपवता येणार नाही.
▶️ व्यक्ती ज्या स्वयंसेवी संस्थेत विश्वस्त आहे त्या स्वयंसेवी संस्थेची कोणतीही मालमत्ता ती विकू शकत नाही. विश्वस्ताचे व्यक्तिगत हित आणि विश्वस्त म्हणून असलेल्या त्याच्या कर्तव्यादरम्यान संघर्ष उत्पन्न होण्याची शक्यता असते. हा व्यवहार फायद्याचा आहे किंवा नाही याची कायदा दखल घेत नाही.
▶️ सारासार विचाराने असा एक नियम करण्यात आला आहे कि विश्वस्ताने ना-नफा तत्त्वावरील स्वयंसेवी संस्थेचे काम कोणत्याही हेतू मनात बाळगून करता कामा नये. कोणत्याही कामाला, प्रकल्पाला या कार्यक्रमाला पूर्ण व्हायला विलंब लागला आणि कितीही व्यक्तिगत गैरसोय झाली तरी हा नियम लागू राहतो. कायदेविषयक सल्ला देणाऱ्या विश्वस्ताने विवादास्पद नसलेल्या मुद्यावर सल्ला देताना शुल्क आकारता कामा नये. फक्त स्वतःला झालेला खर्च काढून घेता येईल.
एखाद्या विश्वस्ताला स्वतःचा वेळ, शक्ती, अनुभव वा कौशल्यासाठी हवे असेल तर त्याने/तिने प्रथम विश्वस्तपदाचा राजीनामा दिला पाहिजे. बाकीच्या विश्वस्तांची इच्छा असेल तर ह्या व्यक्तीची मानधन मिळणाऱ्या पदावर नियुक्ती करता येईल. उदा, कार्यक्रम अधिकारी किंवा प्रकल्प संचालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा कार्यकारी सचिव अशी पदे, मग त्या व्यक्तीला नियमित वेतन व मानधन-इतर भत्यांसह, लाभांसह वा त्यांच्या विरहीतही देता येईल.
- माहिती संकलन : युवराज येडूरे , अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत
मुख्यसंपादक