सरत्या वर्षा,तुला मी काल
सोसायटीच्या नोटीस बोर्डावर पाहिलं…
तसा तू लक्षातही राहिलास,
अनेक कारणांनी,
नकोच त्यांची आठवणही पुन्हा…
तसा तू मावळतोस,सरतोस,
निरोप घेतोस,
वगैरे… काही खरं नाही.
दरवर्षी तुला निरोप देताना
एकच प्रश्न सलतो मनात,
तारखा उलटतात
वर्ष संपतं…
वर्षामागून शतक,
शतक मोजूया
मोजता येईल !
माणसाचं काय…?
वरील माझ्या कवितेचं सारांश.
भूतकाळ (वर्ष)हा फळ्यावर लिहीला म्हणून कळला.पण घडलेल्या घटना विसरता येत नाहीत.वर्षानुवर्षे हे असेच चालू
रहाणार.सध्यस्थितीत माणसे ‘”समजणे” खूप कठीण होत चाललंय.
स्नेहा राणे-बेहेरे, ठाणे/वेंगुर्ला.
मुख्यसंपादक