नाव उंचावण्या घडतो आहे
पुरून उरण्यास झटतो आहे
स्वप्न नवं उराशी धरतो आहे
साकेकर मी शर्थीने सारं करतो आहे…..।1।
नात्यांना घट्ट विणतो आहे
अविचारांना नडतो आहे
सद् विवेका जागतो आहे
साकेकर मी शर्थीने सारं करतो आहे……।2।
लेखणीने भूत खरडतो आहे
विचारांची गुंफण गुंथतो आहे
वास्तवा सामोरे आणतो आहे
साकेकर मी शर्थीने सारं करतो आहे……।3।
मैत्री विस्तार वाढवतो आहे
गावकऱ्यांशी गुज करतो आहे
रास्त मतमतांतरे मांडतो आहे
साकेकर मी शर्थीने सारं करतो आहे……।4।
महामानवाला नतमस्तक होतो आहे
श्रद्धेने भैरी पथ तुडवतो आहे
रुळलेली वहिवाट मळतोआहे
साकेकर मी शर्थीने सारं करतो आहे……।5।
वस्तीचा व्याप वाढतो आहे
साके बदलतंय बघतो आहे
समृद्धीचे स्वप्न पाहतो आहे
साकेकर मी शर्थीने सारं करतो आहे……।6।
– कृष्णा शिलवंत
मुख्यसंपादक