भेटलीस तू मजला,जीवनात आला रंग
माझा सुखाचा संसार,हर घडी तुझा संग.
संसाराची दोन चाके,सोबतीने ही चालली
माझा सुखाचा संसार,प्रीतवेल बहरली.
एकरूप झालो आम्ही, नसे कधी दुजेपण
माझा सुखाचा संसार,सखी माझी जीव प्राण.
हर दिन नवा भासे,हर क्षण आनंदाचा
माझा सुखाचा संसार,होई वर्षाव प्रेमाचा.
युगेयुगे ही संगती,सदा अशीच राहावी
माझी आणि तुझी प्रीत,सदा सर्वदा फुलावी.
- कवी : किसन आटोळे
वाहिरा ता आष्टी जि बीड.
मुख्यसंपादक
खूप सुरेख कविता…