Homeमुक्त- व्यासपीठ"स्वरांगी शेवंती किशोर देशमुख" ( भाग - २ )

“स्वरांगी शेवंती किशोर देशमुख” ( भाग – २ )

किशोर सोड त्याला, तू ऐकणार नाही आहेस का माझं, सोड त्याला….
“मी म्हणतेय सोड त्याला”

नाही शेवंती याला आज मी जिवंत सोडणार नाही, जे काय पुढे व्हायचं ते होईल…..
हा आज इथून निसटला ना तर उद्या पुन्हा त्रास देईल, म्हणून अशा लोकांना त्याचवेळी तिथेच सरळ केलं पाहिजे……

जाऊदे ना किशोर सोड त्याला…..

अगदी मरगळीस येऊन शेवंती खाली पडतच किशोरला म्हणाली आणि किशोर ने त्या *** “सुन्या” चा हात सोडला आणि शेवंतीकडे धावला….

एक नजर वर करून त्याने तिथूनच पाहिले आणि किशोरला दिसल्या त्या “प्रोफेसर- भारती गडगीलवार….

किशोर ने घाईतच बॅगेतून पाण्याची बॉटल काढत शेवंतीच्या तोंडावर पाणी मारले, तशी शेवंती जागी झाली, किशोर ने तिला वर उठवले आणि….

चल लवकर, मॅडम बघतायत असं म्हणून तिथून दोघेही निघाले …….

“””””””””””””””””””””‘”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””

“किशोर विनायक देशमुख”

किशोर आपल्या नावाचा उल्लेख ऐकून भानावर आला आणि समोर बघितले, त्याचे सहकारी स्टेजवर त्याची वाट पाहत उभे होते…..

अरे किशोर ये ना लाजतोस काय मुलींसारखा…..
मूर्ती हातवारे करत म्हणाला….

बावीस वर्षाचा पोरगा अगदी हुशार, पण कधीच कोणत्याच समारंभात लाजेखातर न जाणारा मुलगा आज स्टेजवर जाणार होता, तेही स्वतःला मिळालेले पहिल्या नंबरचे पारितोषिक घ्यायला…..

कॉलेजच्या शेवटच्या वर्षी किशोरने साहित्य संमेलन मध्ये भाग घेतला नी त्याने “साहित्य विश्व-संचार” या सदरात प्रथम पारितोषिक पटकावले होते. त्याला ट्रॉफी आणि अकरा हजार रुपयांच्या मानधना सहित नावाजले गेले होते……

आज किशोर खूप खुश होता…मनात आनंदाने मोर नाचत होते …….

आधीच लाजरा आणि त्यात ही परितोषकाची भर म्हणजे किशोरच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक तर आली होती पण ती चमक कोणाला दिसेल तर शपथ…….
खाली मान घालून चालत चालत तो स्टेजवर आला, मूर्तीकडे एकदा बघितले आणि परत खाली मान घालून उभा राहिला…

माईकवर पुन्हा कोणीतरी ओरडले….

अरे आपल्या कॉलेजचं पोरींपेक्षाही लाजरं कोण ?…..

बसलेली सगळी मुलं एकत्रच ओरडली……

असून असून कोण असणार आपलाच किशा असणार……

झालं …..किशोरच्या डोक्यात अशा ठिणग्या पडल्यात म्हणून सांगू, मनातले मोर उडून गेले आणि त्यांची जागा आता रख-रखत्या ठिणग्यांनी घेतली होती….
बाजूला उभ्या असलेल्या मूर्तीने त्याचा चेहरा बरोबर हेरला तसा त्याच्या खांद्यावर मूर्तीने हात टाकत त्याची पाठ थोपटली….
अरे मित्रा या पोरांचं काय मनावर घेतोस, हस की जरा……

मूर्ती हे बोलत असताना ज्या मुलाने ते शब्द माईकवर बोलले होते त्या मुलाच्या गालावर सन्नकन जाळ उठला होता, तो मुलगा आपला गाल चोळत किशोरची माफी मागायला धावला….माफ कर…..सॉरी …किशोर…परत नाही बोलणार….सॉरी….

त्याचं ते असं अचानक बोलणे पाहून किशोर डोकं खाजवायला लागला, आत्ता हा मुलगा मला चिडवत होता आणि आत्ता लगेच सॉरी कसा बोलतोय….

किशोरने माईकजवळ मान फिरवून बघितलं तर दोन्ही हात कमरेवर ऐटीत उभि असलेली “शेवंती” त्याला दिसली….

“शेवंती मीनाक्षी नामदेव चिंचोळकर”

हो असेच नाव ति आपल्या शालेय जीवनापासून लिहीत आलेय आणि प्रत्येकाला संगतानाही असंच सांगायची…..

शेवंतीला बघून सर्वच मुलींनी ओरडायला सुरवात केली…
शेवंती …..
शेवंती……
शेवंती…….

आणि किशोर….
किशोर शांत पण रोखलेल्या नजरेने शेवंतीकडे बघत उभा होता,
बाजूच्या धनंजय ने ते बघितले आणि किशोरला एक चिमटा काढला…..
किशोर ओरडलाच…..आ….ई….गं

शेवंतीने त्याच्याकडे बघितले तसे त्याने, आ….केलेला तोंड ..हनुवटी हातानेच वर ढकलत आपलेच तोंड बंद केले…
हे सगळं शेवंतीने पाहिले आणि ती हसायलाच लागली….

अख्खा हॉल खदखदून हसत होता…….

आणि अचानक एकदम हॉल शांत झाला….

हॉल च्या दरवाज्यातून इन्ट्री झाली होती……..
“प्रोफेसर-भारती गडगिलवार” यांची……

अचानक हॉल शांत झालेला पाहून शेवंतीची नजर किशोरवरून हटली आणि लागलीच ती आपल्या खुर्चीवर जाऊन बसली….

किशोर भारती मॅडम कडे बघतच राहिला होता, करण मॅडम चालत येत होत्या खऱ्या पण त्यांच्या नजरेचा रोख मात्र किशोरवरच होता…..

“प्रोफेसर- भारती गडगीलवार”

एक उत्तम शिक्षिका, मायाळू तितक्याच कठोर आणि अगदी कडक शिस्तीच्या अशा शिस्तप्रिय….
अशा या प्रोफेसर मॅडम खूप जीव लावायच्या किशोरला, आपला मुलगाच समजायच्या त्याला, हुशार आणि एक चांगला होतकरू असा उल्लेख त्या नेहमी करायच्या क्लासमध्ये….

पण जे काही आज घडले त्याला किशोर आणि मॅडम अनभिज्ञ होत्या……

मॅडम स्टेजवर आल्या आणि पुन्हा माईक वाजला…..
मॅडमनी त्या मुलाकडे एक कटाक्ष टाकला तसा तो मुलगा बसला जाऊन आपल्या जागेवर….

आपल्या खणखणीत आवाजात मॅडम बोलू लागल्या…

नमस्कार – सर्वांना सगळ्यात आधी “शुभ सकाळ”.
मला आपण सगळे ओळखतातच, तरीही मी माझी ओळख करून देते…..

★सगळं हॉल शांत बसून कानावर पडणाऱ्या आवाजात जीव ओतून ऐकत होता.,
कारणही तसेच होते, मॅडम कधीही काही बोलायला लागल्या की त्यांचा प्रेमळ आवाज मुलांना ऐकत राहावं असंच वाटायचं….
मॅडम मुलांवर, आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करायच्या…
कुणाला काही हवं नको, ज्याला खरंच गरज असेल त्याला मदतही करायच्या…..
म्हणूनच त्यांचा तेवढा मान होता कॉलेजमध्ये……

कोण कुठला मुलगा कॉलेजमध्ये कोणत्या मुलीची छेड काढेल तर शपथ….
जर असं घडलं तर त्याच ठिकाणी त्याच वेळी शिक्षा ही त्या मुलाला झालीच म्हणून समजा…..★

“मी – भारती गडगीलवार” आपल्या या “चिंचोळकर शिक्षण संस्थेत” प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे, आज मला अभिमान वाटतो आहे की, आपण सर्वांनी मिळून यंदाचे हे साहित्य संमेलन अगदी उत्साहाने आणि आनंदाने पार पाडलेत, यात सर्वच शिक्षकांचाही खूप मोलाचा वाटा आहे, मला असे वाटते की, आपण सर्वांनी जी मेहनत घेतली ती मेहनत पुढे आपणा सर्वांना उपयोगी पडेल.

तेवढ्यात माईक वरून आवाज आला,
आजचे प्रथम पारितोषिक “किशोर विनायक देशमुख” यांस भारती मॅडम यांनी प्रदान करावे…..

किशोर, मॅडम जवळ गेला नि त्याचे डोळे पाणावले….

किशोर हे आपण आपल्या मेहनतीने कमावलेलं आहे, मी फक्त
आपल्याला मार्गदर्शन केलं एवढंच….

हो मॅडम आपण मला मार्गदर्शन केलंत म्हणूनच मी इथपर्यंत पोहचलो…. आणि..किशोर भावुक झाला…
आणि किशोर सरळ मॅडमच्या पाया पडला ….

मॅडमनी त्याला उठवले- आज जे काही आपण यश मिळवले आहे त्यात माझा खारीचा वाटा आहे हेच माझ्यासाठी खूप आहे, प्रत्येक शिक्षकाला वाटते, आपला विद्यार्थी खूप मोठा व्हावा, त्याने नाव कमवावे…..

हो मॅडम पण त्यासाठी आपल्या सारखे शिक्षक ही हवेत….
एवढे बोलून किशोर स्टेजवरून पायउतार झाला….
पण….पण…
उतरताना एकदाच, हो एकदाच त्याने शेवंतीकडे पाहिले आणि तो उडालाच…..
शेवंतीला जणू माहीतच होतं की तो तिच्याकडे बघणार आहे, ती त्याच्याकडेच बघत होती, आणि किशोरने तिच्याकडे पाहिलं नि शेवंतीने आपला डावा डोळा अर्ध्या सेकंदात झाकला आणि उघडला…..

विचार काय करताय वाचकराजा- शेवंतीने किशोरला डोळा मारला ना राव …..

किशोर थोडा अडखळला सावरता झाला, परत तिच्याकडे बघण्याची हिम्मत काय त्याची झाली नाही…..
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

ये शेवंती तूला किशोर आवडतो का गं….

का गं तुला आवडतो वाटतं….

नाही गं तसं नाही तू काल जे काही करत होतीस ना हॉल मध्ये ते सगळ्यांनी पाहिलंय समजलं ना…!

बघूदे सगळ्यांना , मी ओरडून सांगेन सगळ्यांना ” हो मला किशोर आवडतो”……

अगं ये समोर बघ….
कविता समोर उभ्या असलेल्या किशोर ला बघून शेवंतीला म्हणाली…..

शेवंती लाजलीच, त्याला बघून शेवंती खरंच लाजली होती, अचानक समोर किशोरला बघून ती कावरी-बावरी झाली होती….

च्यायला काल ज्या मुलीने आपल्यासाठी त्या पोराच्या गालावर जाळ काढला ती मुलगी आज आपल्याला बघून चक्क लाजतेय….
किशोर विचार करू लागला …… आणि डोळे मिटून पुन्हा डोळे उघडले तर…
अगदी डोळ्यांसमोरच उभी असलेली शेवंती त्याला दिसली, त्याला वाटले आपल्या पुढ्यात का येईल ही, म्हणून आपला उजवा हात वर उचलला नि तिच्या गालावर स्पर्श केला….

अय्या तू मला हात लावलास, ……

एवढे त्याने ऐकले नि त्याला काही समजायच्या आतच शेवंतीने त्याला मिठी मारली….आणि …आणि…
त्याच्या कानात हळूच म्हणाली ” I LOVE YOU “……

किशोर चे कान सष्यासारखे वर झाले…..
आपल्याला कोणीतरी असं अचानक कोणी म्हणेल हे काही त्याच्या मनात तर सोडा कधी ध्यानात पण आलं नव्हतं….

किशोरचे डोळे विस्फारले होते, तो शेवंतीकडे आ… करून नुसता पाहत उभा होता…..

शेवंतीच्या मनात काय आले कुणास ठाऊक, तिने हाताच्या चिमटीने त्याचे उघडलेले तोंड बंद केले, नि ….

आणि किशोर लाजून धावतच तिथून निघाला तो सरळ जाऊन समोरून येत असलेल्या मूर्ती ला धडकला…..

ये किशा, असा धावतोयस का रे…..

अरे …ती…शेवं…..ती…….शेवंती…..

अरे काय शेवंती..…..काय म्हणतोयस तू……
मूर्तीला काहीच समजले नाही…..

मुर्ती शेवंतीजवळ येवून म्हणाला…..
शेवंती….हा किशा का तुझा जप करत पळाला गं……

ये मुर्तीक्या…..

ये….ये…शेवंती नीट बोल हा….

हा …हा… ये कवे ह्याचं नाव काय गं….

मूर्ती….
कविता लाजतच बोलली…

कविताच आणि मूर्तीचं प्रकरण पूर्ण कॉलेजला माहीत होतं…

अगं ये एवढी काय लाजतेयस, लग्न झाल्यावर त्याच्याच बरोबर राहायचंय तुला….

आणि ये तू “मूर्ती” की काय तो…..तुला का सांगू मी काय झालं ते चल फूट इथून……

कविता कडे हसऱ्या नजरेने बघून “मूर्ती” तिथून निसटला…..

कविता आणि शेवंती समोरच्या बागेत जाऊन बसल्या……
पुन्हा किशोर मूर्तीला, हाक मारत बाहेर येताना शेवंतीला दिसला…..

ये ….ये…किशा….अरे सॉरी..किशोर..
इकडे ये…..

बस रे कुठे जातोयस धावत धावत बस…..

बोल काय ते मला काम आहे मूर्तीकडे…..

किशोर मघाशी तू एवढा का बावरलास….रे…
खरंच माझं तुझ्यावर प्रेम आहे…….!!

अगं पण मी कसा आहे तुला माहीत आहे ना, मला धड कोणाशी बोलायलाही जमत नाही….

पण तरीही तू हुशार आहेसच ना….

ते ठीक आहे गं…..पण…
माझं घर वैगेरे काही नाही….
आई – वडील ही नाहीयत……
मी एकटाच आहे…….

अरे च्यायला….सॉरी….सॉरी…..
इतकंच ना…..
बघ किशोर मलाही आई वडील नाहीयत ते लहानपणीच गेले माझा सांभाळ माझ्या मामा-मामींनी केला….
पण खरं सांगू का किशोर तू मला आवडतोस, खूप आवडतो, माझं अगदी मनापासून तुझ्यावर प्रेम आहे…..

शेवंती, कॉलेज संपायला थोडे दिवस बाकी आहेत आपण नंतर या विषयावर बोलू……

दिवसांमागून दिवस जात होते, किशोर आणि शेवंतीचे एकमेकांना भेटणे चालूच होते,……

शेवंतीने एक करामत मात्र करून दाखवली होती इतक्या दिवसांत…..
भेटीच्या दरम्यान किशोरला लाजण्यातून मुक्त केलं होतं, आता तो अजिबात न लाजता कोणाशीही बोलू लागला होता, अगदी इतर मुलींशी सुद्धा, मग मुलीही अभ्यासातील काही,
नाही समजलं तर त्याला काही न काही विचारायला यायच्या….
त्यावेळी मात्र शेवंती थोडी नाराज व्हायची पण ते तेवढ्यापुरतंच असायचं…..
किशोर हळूहळू चपळ होत चालला होता, स्पर्धेत वैगेरे स्वतःहून आपले नाव नोंदवून यायचा आणि शेवंतीला येऊन सांगायचा….

आणि आज………

शेवंती आणि किशोर बागेत गप्पा मारत बसले होते….
शेवंतीने किशोरचा हात हातात घेतला होता, गप्पा रंगात आल्या होत्या, तेवढ्यात तिथे सुनील आला….

सुनील हा कॉलेजमधील एकदम बेशिस्त आणि बाद मुलगा होता, त्याला सगळे सुन्या म्हणायचे, पण तितकाच तो हुशारही होता, संमेलनात दरवर्षी याचीच वर्णी असायची पण या वर्षी “प्रोफेसर -भारती गडगीलवार” यांच्या मार्गदर्शनाने बाजी मारली होती ती “किशोर विनायक देशमुख” याने…..

याच गोष्टीचा राग सुन्या च्या मनात होता आणि आज त्याला किशोर अगदी वेळेतच सापडला होता…..

सुन्या – साल्या किशा दरवर्षी संमेलनात माझा नंबर यायचा पण या वर्षी तू मला मागे टाकलंस….

शेवंती – सुन्या तू असा का बोलतोयस रे, तो त्याच्या मेहनतीने अव्वल ठरला आहे, या वर्षी तू केलेली मेहनत कुठेतरी कमी पडली असेल…..

सुन्या – तू जास्त बोलू नकोस, याच्यामुळेच माझं नाव खराब झालंय, याला मी सोडणार नाही…..

शेवंती – काय करणार आहेस रे तू, तो साधा आहे म्हणून का, कर काय करायचं ते मी बघते काय करतोस ते…
आणि सुन्याला शेवंतीने धक्का दिला….

सुन्याला ते सहन झालं नाही…..

सुन्याही तसा मुलींचा मान ठेवायचाच पण आता डोक्यातला राग आणि तिने दिलेला धक्का यामुळे तो संतापला….
याच संतापाच्या ओघात त्याने हात उचलला आणि शेवंतीवर त्याचा हात पडणार, इतक्यात किशोर किंचाळलाच….
त्याची किंचाळी ऐकून सुन्याला हात तसाच खाली आला….

किशोर – अरे ये भेकडा तिच्यावर काय हात उचलतोस माझ्याशी बोल, तुझ्यासारखा नामर्द मी अजून तरी पाहिलेला नाही, एका मुलीवर हात उचलतोस कारे भेकडा……

किशोर ने सरळ त्याच्या कमरेला धरून त्याला पालथा पाडला , तसा तो पुन्हा उठला आणि पाठमोऱ्या किशोरच्या पाठीत जोरात बुक्का घातला, किशोरला लागलं, पण स्वतःला सावरत त्याने सुन्याला बेदम मारायला सुरुवात केली….

आता ही बातमी कॉलेज मध्ये सगळीकडे पसरली आणि सगळे जमा झाले….

मूर्ती आला नि किशोर ला मागे खेचले, तसा सुन्याने किशोरच्या पोटात लाथ घातली, किशोर कळवळला, लगेच मूर्तीच्या हाताला हिसका देत सुन्याच्या समोर धीटाने उभा राहिला…
आणि ताठ मानेने बोलता झाला…..

आज बघू तुझ्यात किती हिम्मत आहे ती, बघू दे तरी तू काय करू शकतोस ते…..

सुन्याचा पारा चढला होता…..

दोन्ही हात वर करून मारायला उचललेले दोन्ही हात किशोरने पकडले आणि त्याला उलटा करून त्याच्या पाठीत एक लाथ घातली, तसा सुन्या पुढे जाऊन आपटला…….

सुन्याला आता कळून चुकले होते, आपली काय आता धडगत नाहीय, ज्याला आपण साधा समजत होतो त्याला शेवंतीने आपल्या सहवासात ठेवून, त्याला मेंटली आणि फिजिकली ही स्ट्रॉंग बनवले आहे……..

तो उठला आणि पळू लागला पण किशोर ने त्याचा एक हात पकडल्यामुळे त्याला पुढे जाताच येईना , बरं त्याच्या तावडीतून सुटावं तर अंगात ताकदच राहिली नव्हती…..

शेवंती- सोड त्याला किशोर, सोड त्याला, जाऊदे त्याला तो नाही परत आपल्या वाट्याला जाणार….

वरून सूर्य डोक्यावर आग ओकत होता त्यात शेवंती ओरडून किशोरला सांगत होती, पण किशोर ऐकायला तयार नव्हता…

इतक्यात किशोरने शेवंतीला खाली पडताना बघितलं आणि सुन्याचा हात सोडला, तसा सुन्या एका सेकंदात गायब झाला…

किशोर धावतच शेवंतीजवळ आला, बॅगेतून बॉटल काढून तिच्या तोंडावर पाणी मारले, शेवंती जागी झाली,…..

कविता हळूच म्हणाली – वर बघा….

किशोरने वर पाहिले तर केबिन मधू सर्व झालेला राडा
“प्रोफेसर – भारती गडगीलवार” पाहत होत्या…

शेवंती आणि किशोर तिथून निघून गेले…..
कोणीतरी पाठीमागून आवाज देत आलं….

शेवंती – किशोर तुम्हा दोघांना मॅडम बोलावतायत….

आता आपलं काही खरं नाही असं म्हणून जड पावलांनी दोघेही मॅडमच्या केबिन मध्ये आले….

मॅडम – आज जे घडले ते घडायला नको होते, पण कोणाची चूक आहे हे मला माहित आहे…..

शेवंती – मॅडम खरच सांगतेय मी, तो सुन्या……

मॅडम – शेवंती शांत राहा, किशोर आपण बोला….

किशोर – मॅडम, आम्ही दोघं बागेत बोलत बसलो होतो, दरवर्षी सुनील संमेलनात भाग घेऊन पहिला यायचा, या वर्षी मी पहिला आलो, म्हणून त्याचा राग डोक्यात घेऊन तो माझ्या अंगावर धावून आला आणि …..

मॅडम – ok ok पुढचं मला सगळं माहीत आहे…

तेवढ्यात कॉलेजच्या शिपाई काकांनी सुन्याला धरून आणले, मॅडम नि आधीच शिपाई काकांना सांगून त्याला घेऊन यायला सांगितले होते…

मॅडम – आताच्या आत्ता या दोघांची तुम्ही माफी मागा नाहीतर मी जी शिक्षा करेन त्यास मुकावे लागेल…

सुन्याला माहीत होतं मॅडम चा स्वभाव, जितक्या प्रेमळ तितक्याच शिस्तीला कडक होत्या….

सुन्या – हो मॅडम ,
असं म्हणून सुन्या, शेवंती आणि किशोर समोर येऊन उभा राहिला….

  • तुम्ही दोघांनीही मला माफ करा, आज पर्यंत असं घडले नाही, पण मला किशोर तुझा राग आला होता, कारण तू एक पाऊल माझ्या पुढे गेलास म्हणून, पण आता मला माझी चूक कळली आहे, यापुढे माझ्याकडून असे पुन्हा होणार नाही याची ग्वाही मी मॅडमना आणि तुम्हा दोघांनाही देतो…..हात जोडून आणि मान खाली घालून दोघांसमोर उभा असलेल्या सुन्याला किशोरने आपल्या मिठीत ओढले आणि म्हणाला….

तुला तुझी चूक कळली ना बस्स झालं……

चला यापुढे सगळं विसरून अगदी मैत्रीने राहायचं सगळ्यांनी…
मॅडमनी सर्वांना एक आदरयुक्त सुचनाच केली जणू…..

या अशा आहेत “चिंचोळकर शिक्षण संस्थे”च्या
“प्रोफेसर – सौ. भारती गडगीलवार…….

शेवंतीने सुन्याकडे बघत मॅडम विषयी एका वाक्यात सांगून टाकले……जणू त्यांच्या शिस्तीचा आणि प्रेमळपणाचा या एका वाक्यात त्यांचा सन्मानच होता…..
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

किशोर आणि शेवंती पुन्हा बागेत जाऊन बसले…..
किशोर तुही माझ्यावर तितकंच प्रेम करतोस ना जितकं मी करते तुझ्यावर….
आताच मी बघितलं ना तुला, सुन्याने मला मारायला उचललेला हात बघून तूच ओरडलास ना त्याला…..

हो शेवंती तितकंच प्रेम करतो मी तुझ्यावर…..
आता हे शेवटचं वर्ष संपेल मग कधी भेटायचं आपण….

भेटायचं काय म्हणतोस आपण सरळ लग्नच करू ना !!

काय म्हणतेयस खरं की काय ?
घरी कसं सांगणार आहेस तू ? आणि कधी ?

मी माझ्या मामा-मामींना सांगितलंय आधीच..!
तू त्याची काळजी करू नकोस,त्यांना माहीत आहे, ज्या दिवसपासून मला तू आवडायला लागलास, त्याच दिवशी मी घरी सांगितलं होतं !

अगं या कॉलेजचे सर्वेसर्वा आहेत ते, तरीही काहीच बोलले नाहीत ते ?

नाही कारण मी त्यांची मुलगीच आहे, आणि जे असेल ते खरं सांगेल हे माझ्या या आई-वडिलांना माहीत आहे…
माझ्या आई-बाबांच्या स्मरणार्थ या कॉलेजचे नाव त्यांनी “चिंचोळकर शिक्षण संस्था” ठेवले यातच त्यांचा मोठेपणा आणि माझ्यावर असलेले “आई-वडीलांसारखे प्रेम,….
म्हणूनच मी त्याच्यापासून कोणतीही गोष्ट लपवत नाही……
त्यांनाही तू पसंत आहेस…..मग तर झालं…

आपले ओलसर झालेले डोळे पुसत शेवंती किशोरच्या डाव्या खांद्यावर अलगद विसावली….

किशोरने तिचे डोळे आपल्या हातानेच पुसले…..

किशोर एकदम लाडात येऊन म्हणाला – आपण आपल्याला मूल झाल्यावर काय नाव ठेवायचं गं…..

हे बघ किशोर आपल्याला पहिली मुलगीच होणार,
आणि तीच नाव मी ठेवणार…….

कुतूहलाने शेवंतीकडे बघत किशोर म्हणाला– थांबलीस का ? बोल ना काय नाव ठेवायचं ??

शेवंती आपले दोन्ही हात वर करत हसऱ्या चेहऱ्याने ओरडलीच………

“स्वरांगी शेवंती किशोर देशमुख” …….

क्रमशः

लेखक –
✍️विजय वैशाली दत्ताराम पराडकर
( आण्णा )

🌹 या कथेचा तिसरा भाग पुढच्या दोन दिवसांत येईलच !🌹

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular