हे बेगडी नको ते, डिस्को प्रकार झाले
असली असून सोने,नकली तयार झाले
साडी सुवासिनीला, नावास फक्त उरली
नुसते चट्यापट्यांचे, झबले चिकार झाले
वस्त्रामधील भगव्या, साधू कुठे दिसेना
टीशर्ट कंपन्यांचे , बहुदा शिकार झाले
पावित्र्य लेखणाचे, कळले इथे कुणाला
समजून ती मिठाई, आकार फार झाले
देतोय मी तुला पण, द्यावेस तू मलाही
सौद्यात वागणारे, लाचार यार झाले
गाठीस धोतराच्या, साठीत बांधणारे
घालून जीन्स पँन्टा, आज्जे हुशार झाले
✍️श्री.विजय शिंदे…
३२शिराळा,सांगली.
मुख्यसंपादक