हुंदका …

देवा गाभाऱ्यात तिने
पदर पसरलेला
तुझ्याच सेवकांनी
नरड्याचा घोट आवळला

म्हणे घंटीने
देव जागे होतात
मग किंचाळल्याने
का नाही होत

हुंदके देउन ती
अक्षरशः थकली
तुझ्याच डोळ्यांसमोर
अब्रू शेवटी गेली

रोज भक्ती भावाने
तुलाच ती पुजत होती
आधीच त्या नराधमांना
नरकात लोटायची होती

तुझी सेवा करणे हा
फक्त बहाणा होता
नराधमांनाचा भक्तांना लूटायचे
हाच डाव होता

घरच्यांनी छळले म्हणून
आश्रयाला देऊळ गाठले
नालायकांनी शरीराशी
खेळून एकदाचे संपवले

लवकरात लवकर न्याय
दया अक्षता म्हात्रेला
भरचौकात गोळ्या झाडा दोषींना
हा माझा इशारा सरकारला

कवी – स्वप्नील चंद्रकांत जांभळे
हातीप मु. पो. शिरखल,
ता. दापोली, जि. रत्नागिरी.

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular