Homeमुक्त- व्यासपीठ१९७२ दुष्काळ

१९७२ दुष्काळ

आपण आत्ता सुध्दा आपल्या वडीलधाऱ्या लोकांच्या कडून दुष्काळाचे ऐकतो. दुष्काळ पडला आणि आम्ही सुकडी. मिलो खाल्ला. तसा आणि तेवढा मोठा दुष्काळ कधी पडला नाही. दुःखाचा काळ म्हणजे दुष्काळ अस म्हणलं तर वावगे ठरणार नाही १९७२ साली आत्ता असणारे शेती तंत्रज्ञान. पाणी अडविण्याचा अभाव. चुकिची शेती पध्दत. लोकसंख्या प्रमाणात. लोकांच्या आशा आकांक्षा कमी होत्या. जेवढ मिळेल त्यात संतुष्ट होणारें लोक. मोठ मोठी वृक्षांची घनदाट जंगल. जनावरांना मुबलक चारा. वाहत्या नद्या स्वच्छ पाणी. आजारांचे प्रमाण होते पण लोकांच्या खाण्यासाठी जनावरें असल्यामुळे दुध. दही. सकस आहार. केमिकल विरहित वातावरण. अशी सर्व जीवनप्रणाली अस्तित्वात होती
१९७२ चा तो काळ म्हणजे एक अतिशय ह्रदय भरून टाकणारा काळ येण्यास आपणच कारणीभूत होतो आणि आहे. कारणं आपल्याच अशा आकांक्षा वाढल्या आपणच झाडें तोडली. जनावरांचा चारापाणी संपला. जनावरें कमी झाली. शेतीची कामे करण्यासाठी बैलांचा वापर केला जात असे आज शेती कामासाठी टृकटर विविध शेतीची कामे करण्यासाठी मशिन आल्या त्यामुळे जनावरा पासून मिळवणारे खत पाणी संपले आणि रासायनिक खते बी बियाणे यांचा वापर चालू झाला रासायनिक खते वापरामुळे जमीनीचा पौत कमी झाला जमीनीची उपजाऊ दर्जा कमी झाला त्यामुळे अन्न धान्य तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे कुपोषण सारख्या महाभयंकर संकटाने आपणांस आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात झाली. वर्षाच्या वर्षाला पाडणारा पाऊस. आपल्या जमीनीच्या खपापुरता पडतो मग काही वेळा पूर येतात त्यावेळी पाणी अडविणयाची गरज नाही. तंत्रज्ञान नाही. अज्ञान जास्त असल्यामुळे. येणारे पाणी वाहून जात होते. जमीनीत त्या पाण्याचा अडवून निचरा करण्यासाठी मार्गदर्शन करणारे लोक नाहीत. त्यामुळे आले पाणी गेले पाणी असा प्रकार होत होता.
त्यामुळे आपणांस हळूहळू पाण्याची कमतरता जाणवू लागली. दुष्काळ लगेच पडत नाही किंवा येत नाही त्यासाठी बरेच दिवस आपल्या काही चुकिचे निर्णयांची आठवण होते तो पर्यंत वेळ निघून जाते
जेव्हा दुष्काळ पडतो त्यावेळी सर्वात मोठा फटका बसतो तो म्हणजे जनावरे त्यांना पाऊस पाणी नसल्यामुळे चारा नाही त्यामुळे जनावरें उभ्या उन्हात उघड्या माळरानावर फिरत असतात. अंगावर माॅस नाही चालायला अंगात जीव नाही. काही जनावरे विना चारा पाण्याची टाचा खुडून मरतात. त्यांना खाण्यास गिधाडे सुध्दा ज्या भागात दुष्काळ पडतो तिकडं फिरकत सुद्धा नाहीत मेलेल्या जनावरांमुळे दुर्गंधी पसरते. त्यामुळे रोगराई पसरते त्याचा परिणाम जी लोक दुष्काळाचा सामना करत असतात त्यांच्यावर होते. जनावराप्रमाणे माणसाचे हाल सुध्दा असेच होतें लोकांना खाण्यास अन्न नाही पिण्यास पाणी नाही लोक अन्नासाठी गावोगावी फिरायला लागलें. लहान मुल महिला म्हातारी माणसं. यांचे अगदी विचार करण्यापलीकडचे हाल होते काही लोक उपासमारीची हालत सहन करू शकत नाहीत त्यामुळे आपल्या कुटुंबाची उपासमारीची वेळ बघून आत्महत्या करतात. दुष्काळामुळे गावांत कोण नाही त्यामुळे या आत्महत्या व दुष्काळात उपासमारीने मयत व्यक्तिंना दहन दफन सुध्दा मिळाले नाही. कोल्हे कुत्रे व इतर जंगली जनावरे यांना खात होती किती वाईट आहे. दुष्काळात काही समाजसेवक मदत देतात पण सर्वजण जर अशा परिस्थितीत असले तर कोण कोणाला मदत करणारं
आपणांस वाढत्या लोकसंख्येला तोंड देण्यासाठी जगणे व जगविण्यासाठी रोजगार पाहिजे मग काय औधोगिक वसाहत. एम आय डी सी. विविध केमिकल कंपनी. यामुळे आपणास उधोग मिळाला पण आरोग्य गेले नविन नविन नाव बदलून रोग आले. पिण्याचे दुषित पाणी त्यामुळे पोटाचे आजार विकार वाढ झाली.
आपण आज सुध्दा १९७२ सारख्या महाभयंकर दुष्काळात आहोत. कारणं आज आपण सक्षम नाही. रोजगार नाही. नोकरी नाही. भरती नाही. व्यसन. खून मारामाऱ्या अपहरण खंडणी. बलात्कार महिला अत्याचार. भ्रष्टाचार. लुटमार मग ती शासकीय अधिकारी असो अथवा. सार्वजनिक दलाल एजंट. वाढती गुन्हेगारी. वाढती लोकसंख्या. अंधश्रद्धेचे बळी. शिक्षणाचा अभाव. स्वातंत्र्याचा अभाव. भिक मागणारी मुलं. गैरमार्गाने पैसा मिळविणे. शासकीय योजना आहेत त्या गोरगरीब जनतेला मिळत नाहीत. गोरगरीब जनतेला सकस अन्न धान्य रास्त किंवा मोफत चांगलें स्वच्छ धान्य वितरण करण्याचा शासन निर्णय घेतय पण काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे गोरगरीब उपासीच आहे त्याला पोटभर अन्न सुध्दा मिळत नाही सर्वात जास्त कुपोषण आपल्या देशात आहे हा सर्व प्रकार १९७२ दुषकाळापेक्षा मोठा दुष्काळ आहे.
दुष्काळ ग्रस्त. पूर ग्रस्त. प्रकल्प ग्रस्त. असे विविध प्रकारचे ग्रस्त लोकांची कॅटेगरी केली जाते. त्यांना या बिकट परिस्थिती मुळे होणारे नुकसान भरपाई देण्यासाठी शासन विविध योजना शासन निर्णय जारी करत आहे नुकसानाचे पंचणामे करून पिडित लोकांना भरपाई दिली जाते. त्यात सुध्दा अधिकारी व कर्मचारी हा माझा हा तुझा असा भेदभाव करतात ज्या घराच्या उंबरठ्यावर पाणी येत नाही तो योजनेत बसतो आणि ज्यांचे घर पूराचया पाण्याने पडतात किंवा वाहून जातात ते मोकळं राहतात. अन्न धान्य वितरण करतांना पिडिताना अन्न धान्य मिळतच नाही. असा भेदभाव पक्षपाती पणा केला जातो
म्हणून म्हणतो १९७२ चया दुषकाळापेक्षा सर्वात मोठा दुष्काळ आत्ता आहे
– अहमद नबीलाल मुंडे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular