Homeघडामोडीविनाअनुदानित ते 100% अनुदान मिळेपर्यंत सर्वोतोपरी सहकार्य पण…

विनाअनुदानित ते 100% अनुदान मिळेपर्यंत सर्वोतोपरी सहकार्य पण…

आजरा (अमित गुरव ) – स्थानिकांना विश्वासात न घेता शाळा स्थलांतर प्रकार का घडत आहे ? जो प्रश्न जेऊर चितळे भागातील विद्यार्थी करीता पुढे केला जातोय तोच वाहतुकीच्या प्रश्नाला चाफावडे परिसरातील विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागेल असे संस्थाचालकांना वाटत नाही का ?
कर्मचाऱ्याची मुले जर आजाऱ्यात शाळेसाठी जात असतील स्थानिक शाळेत मुलांची संख्या कशी वाढणार ?


शाळा व्यवस्थापन समितीमध्ये ग्रामस्थांना घेऊन येणाऱ्या अडचणीवर मात करणे शक्य होते पण वेळोवेळी सांगूनही स्थानिकांना कमिटी मध्ये घेतले का जात नाही ? या प्रश्नाची उत्तरे संस्थाचालकांनी द्यावीत.
याबाबत शिक्षणाधिकारी व जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे दाद मागितली असून याचा गंभीरीत्या विचार न केल्यास व्यापक आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल असा पत्रकार परिषदेत सरपंच धनाजी दळवी यांनी केला.
चाफवडे ग्रामस्थांनी विनाअनुदानित ते 100%अनुदान मिळेपर्यंत सर्वोतोपरी सहकार्य केले पण संस्थाचालक हे सर्व विसरले की काय ? की त्यांना ग्रामस्थांनी चाफवडे हायस्कूल चाफवडे मध्ये मुले शाळेत प्रवेश करताना केलेले सहकार्याची आठवण करून द्यावी लागेल असे प्रतिप्रश्न उपस्थित केले गेले . यावेळी सुरेश पाटील , बाळकृष्ण बापट , विजय भडांगे , पांडुरंग थकार , निवृत्ती बापट, उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular