Homeघडामोडीउद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे २१ उमेदवार जाहीर

उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे २१ उमेदवार जाहीर

मुंबई..- ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांची शकलं झाली आहेत. भाजपाने आत्तापर्यंत २३ उमेदवार जाहीर केले आहेत. तसंच शिवसेनेने आणि राष्ट्रवादीनेही उमेदवार जाहीर केले आहेत. तर महाविकास आघाडीतल्या ठाकरे गटाच्या शिवसेनेने २१ उमेदवार जाहीर केले आहेत.

शिवसेना ठाकरे गटाने १७ जणांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता चार नावांची यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरेंनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत चार नावांची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे. वैशाली दरेकर या कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेंच्या विरोधात लढणार आहेत. हातकणंगलेतून सत्यजीत पाटील, पालघरमधून भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार कोण कोण?

१) नरेंद्र खेडकर-बुलढाणा
२) संजय देशमुख-यवतमाळ
३) संजोग वाघेरे-पाटील-मावळ
४) चंद्रहार पाटील-सांगली
५) नागेश आष्टीकर-हिंगोली
६) चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजीनगर
७) ओमराजे निंबाळकर-धाराशिव
८) भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी
९) राजाभाई वाजे-नाशिक
१०) अनंत गीते-रायगड
११) विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी
१२) राजन विचारे-ठाणे
१३) संजय दिना पाटील-मुंबई-ईशान्य
१४) अरविंद सावंत-मुंबई-दक्षिण
१५) अमोल किर्तीकर-मुंबई – वायव्य
१६) अनिल देसाई-मुंबई, दक्षिण मध्य
१७) संजय जाधव – परभणी
१८) वैशाली दरेकर-कल्याण
१९)सत्यजीत पाटील-हातकणंगले
२०) करण पवार-जळगाव
२१) भारती कामडी-पालघर
कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. परंतु, शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाकडे आली आहे. तर, महायुतीत या जागेवरून भाजपा आणि शिंदे गटात धुसफूस सुरू आहे. शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे या मतदारसंघात खासदार असतानाही त्यांना या जागेवरून पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तर, ठाकरे गटाकडे या जागेसाठी पात्र उमेदवार सापडत नसल्याचं म्हटलं जात होतं. परंतु, आता ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. वैशाली दरेकर या २००९ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभा निवडणूक लढल्या होत्या.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular