Homeघडामोडीचिमुकले ची भरारी सह्याद्री पर्वतरांगेतील शिखरे सर करण्यासाठी

चिमुकले ची भरारी सह्याद्री पर्वतरांगेतील शिखरे सर करण्यासाठी

कोल्हापूर -( प्रतिनिधी ) – सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखरे सर करण्यास अन्वी वयाच्या ४ वर्षे ७ महिन्याची कु. अन्वी चेतन घाटगे हीने वयाचे २ वर्षे ११ महिन्याची असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर “कळसूबाई “व ३ वर्ष ५ महिन्याचे असताना कर्नाटक राज्यातील सर्वोच्च शिखर ”मूल्ल्यणगीरी” हे सर करून ही शिखरे सर करणारी जगातील सर्वात लहान गिर्यारोहक होण्याचा किताब पटकावला आहे. तिच्या नावाची नोंद दोन वेळा वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेले आहे.
७ एप्रिल २०२४ रोजी जागतिक आरोग्य दिन आणि या दिनाचे अवचित्य साधून “निसर्ग, पर्यावरण वाचवा आरोग्यपूर्ण आयुष्य वाढवा” , हा संदेश देत सह्याद्री पर्वत रांगेतील व केरळ राज्यातील सर्वोच्च शिखर अण्णामुडी (८८४२ फुट) व मिसापुल्लीमला ( ८६६१ फुट)हे शिखर तर ९ एप्रिल मराठी नवीन वर्षानिमित्त निलगिरी पर्वत रांगेतील व् तमिळनाडू राज्यातील सर्वोच्च शिखर दोडबेटटा (८६५२ फुट )हे शिखर .तसेच ११ एप्रिल क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त निलगिरी पर्वत रांगेतील व् तमिळनाडू राज्यातील दुसरे सर्वोच्च कोलारीबेट्टा (८६२९ फुट) शिखर सर हे शिखर सर करून पुन्हा एकदा जागतिक् विक्रम नोंदवणार आहे.
तिच्या या मोहिमेसाठी ,मुख्य वनसंरक्षक आर् एम .रामानुजन सर, जी गुरुप्रसाद IFS, अधिष्ठाता (डीन) डॉ.सत्यवान मोरे सर .डॉ शिशीर मिरगुंडे सर, वैद्यकीय अधीक्षक सी पी आर हॉस्पिटल, शशिकांत रावळ,समाजसेवा अधीक्षक, डॉ. भावना खंदारे, डॉक्टर तेजल रुद्रा ,महेंद्र चव्हाण …
तसेच अक्षय कुमार फॅन क्लब कोल्हापूरचे राम कारंडे, महिपती संकपाळ व सौ हार्डेकर,
विचारवंत लेखक प्राध्यापक किसनराव कुराडे तसेच अनेक संस्था संघटना यांनी शुभेच्छा दिल्या.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular