गृहपाठची वही जमा करा
असा आवाज वर्गात घुमायचा
मग काही हुशार मुले टेबलावर ठेवायचे
आणि काही मात्र मार खायचे छडीचा
आपला जीव ओतून तुम्ही
आम्हाला हिरीरीने शिकवत
पण तुमच्याकडे लक्ष न देता
दुसरेच उद्योग आम्ही करत बसत
कधी शाळेच्या बाहेर तुम्ही दिसलात
तर आम्ही लपून जात होतो
आज कधी तुमची आठवण आली
तर मन भेटण्यासाठी उतावीळ होतो
बहुतेक मुले बोलले होते वर्गात
मी डॉक्टर, पोलीस,होणार
आज तापाने जरी फनफनलो तर
इंजेक्शन घेण्यासाठी गाठतोय डॉक्टर
शाळेत गणित आणि इंग्रजी तासाचा
खूप कंटाळा आम्ही करत असत
मग कधी कधी तास बुडवायचो
आज त्याच विषयात कच्चे झालो आहोत
अभ्यास कर, अभ्यास कर रे
खूप वेळा आम्हा सर्वांना बोलत होते
पण आपलेच खरे असे करायचो
गुरुजी तुमचे ऐकायला पाहिजे होते
कवी:स्वप्नील चंद्रकांत जांभळे
ता. दापोली, जि. रत्नागिरी,
गाव.हातीप (तेलवाडी).
समन्वयक – पालघर जिल्हा