Homeवैशिष्ट्येभाग २९ लोकांची देण्यामागची प्रेरणा

भाग २९ लोकांची देण्यामागची प्रेरणा

भाग २९
लोकांची देण्यामागची प्रेरणा

देणाऱ्याने देत जावे….घेणाऱ्याने घेत जावे….
घेता घेता घेणाऱ्याचे हात न घेता सहभागी व्हावे ||
आपल्या कानातील कवच कुंडले देण्यासाठी प्रसंगी एक कान काढून देण्याची तयारी दर्शविणाऱ्या कर्णाचा दानशूरपणा, दान करण्यासाठी सत्तेचा, आपल्या सिंहासनाचाही त्याग करणारा बळीराजा, आपल्यातील काही वंचितांच्या आयुष्यातील आनंद येण्यासाठी मुक्त हस्ताने उधळण करणारा सांताक्याज एखाद्या जीवनावश्यक गोष्टीसाठी मोहरमच्या तत्वज्ञानातून दिसणारी कळकळ व त्याग “ दे दान…छुटे गीरान (ग्रहण)” या उक्तीतून अभिप्रेत असलेला अर्थ…आपल्या लहानपणी अनेकदा ऐकलेल्या गुप्तधनाचा वाण वसा देण्याच्या पारंपारिक गोष्टीतून मानवाची दानशूर वृत्ती दिसून येते.
देणारा व घेणारा ह्यांच्यातील नात्याबद्दल बोलायचं झालं तर हनुमना-राम भक्ती इतक ते घट्ट असायला हवं.

लोक सामाजिक कामासाठी मदत का देतात?
▶️ घराण्याची परंपरा म्हणून
▶️ संस्थेच्या भक्कम आधारस्तंभ माहिती असल्यामुळे
▶️ गरजूंना मदत केल्याचे मानसिक समाधान म्हणून
▶️ आपण दिलेल्या मदतीतून काही सकारात्मक, विकासात्मक काम उभे रहावे म्हणून
▶️ संस्थेच्या ध्येयधोरणे उद्दिष्टांवर असलेला विश्वास
▶️ अडचणी सोडण्यासाठी मदत म्हणून
▶️ चांगले काम करणाऱ्या लोकांना प्रेरणा मिळते म्हणून
▶️ स्वतःचा आनंद किंवा दु:ख (विशेषतः आप्त्यांना गमावल्याचं इत्यादी) इतरांबरोबर वाटण्यासाठी
▶️ एखाद्या समाजाचा किंवा संस्थेचा घटक बनवण्यासाठी
▶️ धार्मिक कारणासाठी
▶️ सत्ता मिळावी या भावनेतून
▶️ आपला प्रभाव पडावा म्हणून
▶️ एखाद्या चुकीचा पश्चाताप करण्याच्या भावनेतून
▶️ मित्रगणात/ समाजात स्वतःची वेगळी ओळख जपण्यासाठी
▶️ करसवलत मिळवण्यासाठी किंवा स्वतःचे आर्थिक नियोजन अधिक चांगले करण्यासाठी/
▶️ मदतीसाठी उपलब्ध असलेल्या योग्य संधीचा फायदा घेण्यासाठी.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular