१) व्यवसाय कोणताही असला तरी तो वेगळ्या कल्पणेशिवाय उभाच राहू शकत नाही. कारण तुमच्या आधीच बऱ्याच लोकांनी तो उद्योग सुरू केलेला असतो. त्यामुळे त्यांच्या पेक्षा वेगळी काहीतरी कल्पना घेऊन व्यवसायात उतरले पाहिजेत. तरच यशाची पायरी गाठता येईल.
२) बिझनेस प्लॅन -: बिझनेस प्लॅन हा व्यवसायाचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे तोच योग्य दिशा देण्याचे काम करतो. आणि हे हवे असेल तर बिझनेस प्लॅन प्रभावी हवाच. बिझनेस प्लॅन असेल तर व्यवसायाची दिशा ठरवता येते. त्यादृष्टीने बिझनेस प्लॅन हा सर्वोत्कृष्ट हवा.
३) सकारात्मक दृष्टीकोन -: सर्व गोष्टीला सकारात्मक दृष्ट्या पाहणे हा व्यावसायिकाचा खूप मोठा चांगला गुण असतो. या गुणामुळे आलेल्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे कसे जायचे हे माणसाला जमते. व्यवसायात चढ उतार ही नित्याची बाब त्यामुळे सकारात्मक राहणे ही अत्यावश्यक गरज बनते.
४) संयम ठेवा -: कोणताही व्यवसाय उभा केला म्हणजे लगेच मोठा होत नसतो . त्याचे सुरवातीच्या काही दिवस हे बाळंतपणा सारखे असतात. ज्यामध्ये जास्त नफा तर मिळत नाहीच पण खूप जपावे लागते. त्यामुळे संयम बाळगत एक एक पाऊल पुढे टाकत जायचे असते. असे करताना तुम्ही एक दिवस नक्कीच चित्याच्या वेगाने प्रगती करत रहाल.
या चार टिप्स तुमचा व्यवसाय वाढीस पूरक काम करतील यात तिळमात्र शंका नाही.
मुख्यसंपादक