मन मनास जाणते
प्रेम त्याचे नाव
एकास होई दुःख
दुसऱ्याचा बदले भाव..०१
तिजवर माझे प्रेम
हवाहवासा सहवास
एक होऊनी श्वास
नयन मिळे नयनास..०२
प्रेमाला उपमा नाही
जग हे प्रेममय
प्रेमाने जग जिंकते
होते आनंदमय..०३
दुःखीतांचा आधार
वेदनेवरची फुंकर
प्रेमाचे दोन शब्द
मनास देई धीर…०४
जरी धरणीचा कागद
केली सागराची शाई
शब्द हे संपतील
प्रेमाला उपमा नाही..०५
कवी : किसन आटोळे
वाहिरा ता.आष्टी
मुख्यसंपादक