आजरा (हसन तकीलदार) –मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या पार्श्वभूमीवर आजरा नगरपंचायतीकडून शहरात प्लास्टिक बंदीबाबत धडक कारवाई करण्यात आली. बाजारपेठ आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये तपासणी करत ३ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले असून दोषींवर ५८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ही कारवाई दि. १ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार करण्यात आली. या मोहिमेचा उद्देश प्रशासनातील कार्यक्षमतेला गती देण्याबरोबरच नागरिकांमध्ये पर्यावरणस्नेही वर्तनाची जाणीव निर्माण करणे आहे.

स्वच्छता निरीक्षक अमर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर थांबवण्यासाठी जनजागृती करताना थेट कारवाईही करण्यात आली.
या अभियानात मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ लिपिक संजय यादव, अरुण कांबळे, कोमल देसाई, अजिंक्य बागल, अनिकेत पाटील, रमेश कांबळे, जयवंत कांबळे, गणेश राम आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

यासोबतच कचऱ्याचे ठिकाण सुशोभीकरण, सीसीटीव्ही बसवणे, सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, विरंगुळा केंद्राची स्थापना आदी उपक्रमही या अभियानांतर्गत राबविले जात आहेत.
नगरपंचायतीने नागरिकांना आवाहन केले आहे की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक वापर टाळावा आणि शासकीय नियमानुसार सहकार्य करावे.
🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!
आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:
📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
व्हाट्सअप ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/KXy0XT9XJRpChVuADfr21r?mode=r_c

मुख्यसंपादक



