आजरा (हसन तकीलदार ): -येथील एस. टी. स्टॅंड नजिक सोनेखान कॉम्प्लेक्स आपला बझारच्या वरील मजल्यावर हेल्थकेअर क्लिनिकल लॅबचे डॉ. इंद्रजित देसाई यांचे हस्ते नुकताच उदघाट्नचा कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला.
संपूर्ण स्वयंचलित संगणकीय लॅबोरेटरी असून याठिकाणी रक्त, लघवी, थुंकी, थायराईड व हार्मोन्स या सर्व प्रकारच्या तपसण्या अल्पदरात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी मेडिकल असोसिएशचे अध्यक्ष डॉ. गौतम नाईक म्हणाले की, आजऱ्यात ही नवीन अत्याधुनिक लॅब आजरा वासियांच्या सेवेसाठी तत्परतेने आजपासून सेवा देणेसाठी सुरु झालेली आहे. आजऱ्यातील रुग्णासाठी चांगले काम करतील अशी अशा व्यक्त करतो आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. उदघाट्न प्रसंगी डॉ. इंद्रजित देसाई म्हणाले की, या लॅबमध्ये सौजन्यपूर्वक वागणूक देणार आहेत. पूर्वीपासून बुरहान खेडेकर या क्षेत्रात काम करीत आहेत त्यामुळे यांच्या कामाची आम्हाला प्रचिती आहे. योग्य आणि दर्जेदार सेवा देतील अशी आम्हांला खात्री आहे.

यावेळी डॉ. प्रवीण निंबाळकर, डॉ. निलेश भारती, युवा नेते विक्रमसिंह देसाई, डॉ. युनूस सैय्यद,जुबेर सोनेखान, नियाज हसन तकीलदार,युनूस लाडजी, जुबेर बागवान, असलम आगलावे, मजीद खेडेकर आदिजण उपस्थित होते.
📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!
📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!
📺 यूट्यूब चॅनेल: 👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk
📘 फेसबुक पेज:👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
🌐 वेबसाईट:
www.linkmarathi.com
🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!
📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

मुख्यसंपादक



