Homeघडामोडी"विरोधक स्टंटबाजी करत नगरपालिकेची बदनामी करत आहेत; विकासकामांना पाठिंबा द्या" – नगराध्यक्ष...

“विरोधक स्टंटबाजी करत नगरपालिकेची बदनामी करत आहेत; विकासकामांना पाठिंबा द्या” – नगराध्यक्ष अशोक चराटी

अधिकाऱ्यांना दमदाटी नको, सकारात्मक चर्चेतून कामे मार्गी लावावीत; विरोधकांवर नगराध्यक्षांचा थेट निशाणा.

आजरा नगराध्यक्ष अशोक चराटी यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार टीका करत, “काही विरोधक स्टंटबाजी करून नगरपालिकेची बदनामी करत आहेत. नागरिकांमध्ये गैरसमज पसरवून अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचे प्रकार थांबले पाहिजेत,” असे स्पष्ट सांगितले.
नगराध्यक्षांनी सांगितले की, शहरातील रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता आदी विकासकामांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले असून टेंडर प्रक्रिया पूर्ण होताच कामांना गती मिळेल. सर्व नगरसेवक शहराच्या विकासासाठी एकदिलाने काम करत असल्याचाही त्यांनी दावा केला.
यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांकडून आजरा नगरपालिकेच्या मागण्यांकडे अपेक्षित लक्ष मिळत नसल्याची खंतही व्यक्त केली.

यावेळी नगरसेवक अनिकेत चराटी , अनिरुद्ध केसरकर, संजय चव्हाण, आरिफ खेडेकर, महेश खेडेकर, अश्विन डोंगरे, समिर चांद, परेश पोतदार उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular