आजरा (हसन तकीलदार ):-मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान 2025अंतर्गत आर. बी. एस. के. ग्रामीण रुग्णालय आजरा व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर यांचेमार्फत आजरा तालुक्यातील इटे येथील सागर पाटील यांची चिमुकली कन्या अनुश्री पाटील हिची हृदय शस्त्रक्रिया मुंबई येथील कोकीलाबेन हॉस्पिटमध्ये मोफत करण्यात आली.
आर. बी. एस. के. ग्रामीण रुग्णालयचे तपासणी पथक इटे येथील अंगणवाडीत मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी गेले होते. त्यावेळी अनुश्रीच्या हृदयाच्या ठोक्यामध्ये फरक जाणवला त्यावेळी पथकातील डॉक्टरांनी कोल्हापूर सी. पी. आर. मध्ये तपासणी करण्याचा सल्ला दिला. तपासणीअंती हृदय शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला देण्यात आला त्यावेळी सागर पाटील यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तपासणीवेळी बाळाचे वय अवघे तीन महिन्याचे होते. तरीसुद्धा डॉक्टरांच्या पथकाने त्यांना धीर दिला. आणि मुख्यमंत्री गतिमानता अभियानाची माहिती देऊन ग्रामीण रुग्णालय आजराची टीम व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर यांचेमार्फत चिमुकली कु. अनुश्री सागर पाटील हिची हृदय शस्त्रक्रिया मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटल येथे मोफत करण्यात आली. याकरिता महाराष्ट्र शासनाच्या आर. बी. एस. के. कार्यक्रमांतर्गत तिच्यावर अंदाजे तीन लाख रुपये खर्च असणारी शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करून दिल्याबद्दल तिच्या पालकांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व अजितदादा पवार तसेच आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय आजरा येथील वैद्यकीय अधीक्षक अमोल पाटील, डॉ. सुरजीत पांडव, डॉ. स्वाती रेडेकर, फार्मासिस्ट सारिका शिंदे, नर्सिंग ऑफिसर सुषमा साठे, सी. पी. आर. कोल्हापूर येथील डी. पी. एस. प्रज्ञा संकपाळ व केळूसकर यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त केले.

त्याचप्रमाणे या सर्व डॉक्टरांच्या पथकाने उपक्रमाची माहिती दिल्याबद्दल व महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!
📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!
📺 यूट्यूब चॅनेल: 👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk
📘 फेसबुक पेज:👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
🌐 वेबसाईट:
www.linkmarathi.com
🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!
📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

मुख्यसंपादक


