आजरा (हसन तकीलदार) :
कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाला पर्यायी मार्ग तपासण्याचे आदेश अवर सचिव राजेश भोगले यांनी दिले असल्याची माहिती शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक कॉ. संपत देसाई यांनी दिली आहे.
निसर्गाचा विध्वंस, वनसंपदेची हानी आणि शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान टाळण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तीव्र आंदोलन सुरू आहे. आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने, मोर्चे आणि “तिरंगा आमच्या रानात” यांसारख्या उपक्रमांमधून शेतकऱ्यांनी आपली भूमिका ठाम केली होती.
या संघर्षामुळे सरकारला कोल्हापूर जिल्ह्यातील मूळ आखणी रद्द करावी लागली आहे. आदेशानुसार शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील सर्व संभाव्य पर्यायी मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तपासून शासनास सादर करावेत, असे नमूद करण्यात आले आहे.
कॉ. संपत देसाई यांनी स्पष्ट केले की, “शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे हा महामार्ग रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहील. हा शेतकऱ्यांचा आणि पर्यावरणप्रेमींचा विजय आहे.”
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक


