वाघ झोपलेला पाहून इथे
लांडग्यांनी धूमाकूळ
घालायला सूरवात केलीय..
सत्याची चिरफाड,
सन्मानाच वस्त्रहरण
अन कोणीतरी कष्टानं
कमवलेल्या आयत्या ताटावर
ताव हा एकच अजेंडा आहे
बोकाळलेल्या लांडग्यांचा….
कूंभकर्ण सूद्धा सहा महीण्यातून
एकदा जागा व्हायचा म्हणे!
पण ह्या वाघाची अनाकलनीय
चिरनीद्रा समजण्या पलीकडची…
सारं होत्याच नव्हतं झाल्यावरच
जागा होणार आहे की काय हा वाघ ?
खर तर जंगलाच जंगलपण
अबाधित राखण्यासाठी वाघाच
जागेपण गरजेचं आहे…
म्हणूनच स्रजनहो लेखनी हातात घ्या
झोपलेल्या वाघाला जागं करण्यासाठी
- जगन्नाथ काकडे मेसखेडकर
मुख्यसंपादक