Homeकृषीमहिलांसाठी कृषी सखी ही सुवर्णसंधी का ?

महिलांसाठी कृषी सखी ही सुवर्णसंधी का ?

आजरा (अमित गुरव ) -: राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत निवड ही महत्त्वाची ठरणार आहे या अभियानाच्या माध्यमातून गावात नैसर्गिक शेती गट स्थापन होणार असून त्यासाठी कृषी सखी निवड केली जाणार आहे पण अनेकांच्या मनात प्रश्न आहे की, कृषी सखी म्हणजे नेमके काय?आणि महिलांसाठी ही संधी किती महत्त्वाचे आहे ?
ग्रामीण भागात महिला शेतीतील बहुतांश कामांमध्ये सक्रिय असतात मात्र निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग अत्यंत कमी असतो. कृषी सखी योजना ही परिस्थिती बदलण्याची क्षमता होते.


राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रत्येक क्लस्टरमध्ये दोन कृषी सखी कार्यरत राहणार आहेत. त्यांचे काम शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन करणे प्रशिक्षण देणे शेतकरी गट तयार करणे विविध योजनांची माहिती पोहोचवणे आणि गावात जनजागृती करणे म्हणजेच हे पद मिळणारी महिला गावातील शेती विकासाची स्थानिक दुवा बनू शकते.
या योजनेकडे केवळ मानधन म्हणून पाहणे पाहण्यापेक्षा त्याच्यातून महिलांना संवाद कौशल्य शासकीय योजनांचे ज्ञान आणि शेतकऱ्यांशी थेट काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. कृषी सखी ची भूमिका सामाजिक ओळख निर्माण करून देऊ शकते.
कधी कधी एखादी छोटे पद भविष्यात मोठी ओळख निर्माण करण्याची संधी असू शकते त्यामुळे महिलांनी या संधीचे सोनं करावं असे आवाहन आजरा पंचायत समिती सभापती जयश्री गाडे यांनी लिंक मराठी शी बोलताना केले आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular